Posts

Showing posts with the label activities

कानसेन

Image
 शाळा .... रामला मी प्ले ग्रुप ला घातलंच होतं त्यामुळे शाळा ही  कन्सेप्ट त्याला नवीन नव्हतीच.. फरक एवढाच होता की ही मोठी शाळा आहे .. मोठे वर्ग .. मोठी जागा .. सगळंच भव्य दिव्य .!. त्याला पण आवडलं  आणि मलाही आवडलं .. त्याच शालेय जीवन सुरु झाल्याचा मला आनंद तर आहेच पण एक टेन्शन सुद्धा आलंय .. करेल ना नीट.?. जमेल ना त्याला .?. टिपीकल !! शाळेत "आज काय काय शिकवलं ?" यावर मला कधीही उत्तर मिळत नाही .डबा  खाल्ला का यावरही कधीतरी उत्तर मिळतं , पण कुणाचंही  लक्ष नसता शाळेत शिकवलेले श्लोक , गाणी , गोष्टी..  एकटाच असताना तो म्हणतो , मी ऐकते ! फार मज्जा येते ऐकताना .. एकदा  स्वयंपाकघरात काम करताना राम हॉल मध्ये गाडी पार्किंग खेळात होता आणि खेळता खेळता श्लोक म्हणायला सुरवात केली " मोरया मोरया मी बाण ताणें .. तुझीच सेवा कर कुण्या जाणे ... अन्याय माझे कोटीच्या कोटी.. मोरेश्वर आबा तू झालं छोटी ..!" माझे कान तिकडेच होते .आधी मला समजलं च नाही हा नक्की काय म्हणला .. "मी  बाण ताणें ..?" हे नक्की कोणत्या श्लोकात आहे.. हा नक्की काय श्लोक आहे.. या श्लोकाशी मिळता  जु...

रामची सायकल

Image
सायकल घेऊन देताना रामपेक्षा जास्त आनंद मला आणि प्रणव ला झाला होता मला ३ री मध्ये असताना मिळाली होतोय आणि याला ३ वर्षांचा असतानाच मिळालीये ..!! त्यादिवशी सायकल घरी घेऊन येतानाच तो झोपून गेला ते थेट दुसऱ्यादिवशी सकाळीच जाग आली त्याला.. उठल्या उठल्या आधी गॅलरी मध्ये गेला सायकल दिसल्यावर  राम चा आनंद बघण्यासारखा होता.. सगळ्या घरात सायकल  फिरवत होता पूर्ण पँडल  मारता येत नव्हतं पण प्रयत्न पूर्ण करत होता ... सगळ्यांना त्याची सायकल दाखवली हाक मारून मारून.!!. सायकल ला मागे एक सीट आहे त्यावर अनय बसणार हे त्याच त्यानी पक्क करून सगळ्यांना सांगून टाकलं .. "मी बसू का?" असं  काव्या नि विचारलं .. मी समोरच उभी होते म्हणलं बघू काय म्हणतोय , तर चक्क " हो..  तू मागे बस आता अनय नाहीये तर .. शेअरिंग  इस कॅरिंग !" मी पण एक्दम उत्साहात "व्हेरी गुड राम !" असा म्हणलं . त्या दिवशी रात्रीच त्या सायकल चं  सगळं प्लास्टिक च कव्हर काढून फेकून देण्यात आलं मगच स्वारी झोपायला गेली . आता शाळा सुरु व्हायला थोडेच दिवस शिल्लक राहिले होते .. ३-४ दिवसातच तो पूर्ण पेंडल मारायला लागला . !! रोज...

उन्हाळ्याची सुट्टी भाग - ५

Image
संध्याकाळचे ७:३० वाजलेले .. आज राम खेळून आला घरात .. बूट काढले पाणी प्यायला आणि बेडरूम मध्ये गेला .. मी स्वयंपाकघरात त्याच्यासाठी जेवण बनवत होते, मेथीचे पराठे .. छान कणिक भिजवलेली होती.. प्रणव ची मीटिंग चालू होती.  आई पेपर वाचत होत्या हॉल मध्ये .. सगळं शांत ... सुरळीत !!.. मी हा वेळ  चांगला १५ मिनिटे  अनुभवला .. इतकं छान वाटलं शांत .. पळापळी नाही ! आरडा ओरडा नाही..! पण १६ व्या  मिनिटाला हीच  शांतता मलाच खायला उठली.. एवढा शांत .!. ते पण राम घरात असताना .! काहीतरी अजब आहे.. ही  चांगली शांतता नाहीये .. किंवा यावेळेला ही शांतता चांगली नाहीये !!!  काहीतरी गडबड आहे.. हात धुवून मी बेडरूम मध्ये गेले तर महाशय बाथरूम मध्ये होते .. माझा साबण जो बेसिन वर होता तो .. बाथरूम मधल्या स्टूल वर चढून  यानी खाली काढला होता.. स्वयंपाकघरातून काटा चमचा कधी नेला होता मला अजूनही समजल नाही .. साबणाला काट्या चमच्याने भोसकून भोसकून त्याचा लगदा केलेला होता .. पूर्ण साबणाची वाडी वाया गेलेली मी बघितली आणि सगळी कडे साबण ..! हात तर बारबाटलेलेच होते पण त्याचे पांढरे छाप बेडरूम च्या...

उन्हाळ्याची सुट्टी भाग- ४

Image
अजून दीड एक महिना तरी शाळा सुरु होण्यासाठी आहे सकाळी सकाळी ब्रश करण्याची रेस लावली होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार सुरु होते की पाणी खेळण्या पेक्षा बाकीचे उपक्रम काही करता आले तर राम ला मजा पण येईल आणि मला पाणी वाचवता येईल त्याबरोबरच थोडी कामं कमी होतील अश्या विचारात असतानाच राम च्या हाताला स्वयंपाकघरातील हिंगाची डबी लागली आणि ती उलटी करून उघडणं त्याला सहज सोप्प गेलं परिणाम ... तोंडात ब्रश धरून खाली सांडलेलं हिंग गोळा करत होते मी !! तोंडातली पेस्ट आणि खाली सांडलेलं हिंग यांचं मिश्रण ना होऊ देता आणि कुणाच्याही पायाखाली यायच्या आत जेवढं शक्य होता तेवढा हिंग पुन्हा डबीत भरला आणि घरभर त्याच झाकण शोधत मी फिरत होते... !घाई घाईनी तोंड धुवून परत स्वयंपाकघरात गेल्यावर दिसलं रॅक मधले सगळे डबे राम नि खाली काढलेत आणि चमच्याने तो वाजवतोय ऑर्केस्ट्रा ....!! झाकण सापडला नव्हताच पण डबी मी वर ठेऊन दिली ...माझं थोडं स्वयंपाक घरातलं काम होईपर्यत वाजवू देत ... प्रणव नि दूध पाजणे , दात घासून देणे , शी धुणे हि काम करेपर्यन्त मी दूध तापवणे , नाश्त्याची तयारी करणे , आमच्यासाठी चहा बनवणे हि काम उरकली ... आणि ...

उन्हाळ्याची सुट्टी भाग -३

Image
पाणी खेळणं हा या वयातल्या मुलांचा अत्यंत आवडीचा उद्योग असतो वेगवेगळ्या मार्गानी राम ला बाथरूम मध्ये तरी जायचं असतंच नाहीतर मठाचा नळ तरी सोडायचा असतो , किंवा प्यायला ग्लास भरून घ्यायचं अर्धाच किंवा त्यापेक्षा कमी प्यायचं उरलेलं खेळायला घ्यायचं .. हा एक दिनक्रम रोजचा सुरु झालेला होता सुट्टी संपायला किती दिवस उरलेत हे मी रोज बघत होते. कुठून नवीन नवी आयडिया शोधून काढतो राम कधी कधी फार कौतुक वाटतं  त्याच.. पण नंतरचा पसारा आवरताना मात्र सगळं कौतुक निघून जातं . दुपारचे साधारण १२:३० वाजले होते उन्हाचा पारा वाढलाय अशी बातमी टीव्ही वर चालू होती इकडे राम नि ग्लास भरून माठातील पाणी घेतल गॅलरी मध्ये जाऊन ओतलं , सगळे कपडे काढ्ले आणि त्या पाण्यात जाऊन बसला मी कामात होते माझं याकडे लक्षच नव्हतं थोडावेळ बसून त्यात लोळायला लागला आणि आनंदाने ओरडायला पण लागला मग मी विचार केला इतका कसला आनंद झालाय याला... येऊन बघते तर साहेब गॅलरी मध्ये ओतलेला पाण्यात पोहायची ऍक्टिंग करत होते .                     "काय करतोयस ?" असं मी शांतपणे विचारलं तर गळ्यातला धा...

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

Image
मावशी बरोबर मनसोक्त चिखल खेळून झाल्यावर स्वारी तबला आणि पेटी कडे वळली. मावशीला त्याला मांडीवर बसवून त्याचसोबत पेटी वाजवण्यापेक्षा त्या पोसिशन मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट होता असं मला सुरवातीला वाटला पण नंतर दोघेही अगदी इंटरेस्ट घेऊन त्या पेटीवर काम करत होते तल्लीन होऊन चालेल होता कितीतरी वेळ , पेटीवर " असावा  सुंदर चॉकलेट चा बांगला " वाजवून झालं, अर्थात कुणालाही समजल नसतंच ते , मग बाबा  म्हणला " लट उलझी सुल्झ जा बालमा ..." ते वाजव पण नक्की काय वाजवायचा आहे कुणालाच समजलं  नाही  त्यामुळे परत ते दोघं 'सा रे  ग म" वाजवायला लागले  आणि  मला किमान  घरातला आणि बाथरूम मधला चिखल साफ करायला वेळ मिळाला . त्याला आवडत खरंतर पण अजून लहान आहे तो , त्या वाद्यांचा योग्य आदर करून ते नीट वाजवायला शिकला तर मला फारच आनंद होईल .  उन्हाळ्याची सुट्टी सुरु होऊन १५/२० झाले नसतील तोवरच आमच्या ज्ञानात नवीन भर पडली होती " बोर होतंय !" वय वर्ष ३ जेव्हा म्हणतात , बोअर होतंय त्यावर वय वर्ष ३०/६० असणार्यांनी  काय उत्तर द्यायचं असतं  बरं ?? मग मी अ...

पहिली उन्हाळ्याची सुट्टी - भाग १

Image
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर खरंतर मला त्याला समर कॅम्प ला टाकावं असं खूप वाटलं होतं  म्हणजे शाळेत जायची सवय पण मोडणार नाही आणि दिवसातले २-३ तास तो चांगल्या उपक्रमांमध्ये गुंतलेला असेल , माझं घरही  २-३ तास स्वच्छ राहील पण या आजकालच्या समर कॅम्प आणि ऍक्टिव्हिटी सेंटर च्या फीया एवढ्या वाढवल्या गेल्यात ना कि तेवढ्या पैशात घरातच एखादं प्ले स्टेशन , व्हिडिओ गेम , हॉट  व्हील्स चा सेट वगरे येईल.  (आमच्या आईवडिलांसारखाच आम्ही पण विचार केला आम्हाला नाही मिळाला, पोराला घेऊन द्यावा !) २ दिवसात त्या प्ले स्टेशन चा प्ले एकीकडे स्टेशन भलतीकडे ....  व्हिडिओ बाथरूम मध्ये ... गेम  बेडरूम मध्ये...  व्हील्स पायाखाली येऊन आमचं डोकं हॉट झालय असं काहीसं चित्र डोळ्यासमोर आलं आणि घेऊन द्यायच्या विचारांपेक्षा न घेऊन देण्यावर आमचं पटकन एकमत झालं ! आणि सगळेच विचार रद्द करून आलेली सुट्टी राम घरीच घालवणार असं ठरलं . तसं बघायला गेलं तर त्याची पहिलीच उन्हाळ्याची सुट्टी आहे ही आणि आई म्ह्णून माझीही !!  आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेजे काही करायचो ते सगळं राम नी...

ब्रदर शार्क आणि बेबी शार्क

Image
"अनय माझा छोटा भाऊ आहे ! मी अनय चा दादा आहे " हे राम च्या डोक्यात इतकं पक्कं आहे की "अनय  बेबी शार्क आहे आणि मी ब्रदर  शार्क आहे !!" असं  तो मला नेहमी म्हणतो. मलाच काय पण त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांना, सोसायटी मधल्या मैत्रिणींना आणि मामाच्या घरी देखील सगळ्यांना  हेच सांगून ठेवलंय .त्यामुळे अनय  कोणालाही ओळखू दे किंवा न ओळखू दे,आमच्याकडे अनय ला सगळे ओळखतात. रामचा  प्रचंड जीव आहे त्याच्या अत्त्येभावावर .या भावंडामध्ये तस वर्षभराचच अंतर आहे त्यामुळे या दोघांचं एकमेकांशी छान जमेल असं मला आणि प्राचीला वाटतं . खोड्या काढण्यामध्ये अनय  जरा मागे असतो पण आपला दादा जे काही करतोय ते तो नीट लक्ष देऊन बघत असतो . रांगत जाऊन  हळूच जाऊन अनय नी फ्रिज उघडलेला पाहून चालत चालत  राम पण तिकडे गेला वरच्या बाजूच्या कप्प्यातून मसाल्याची पाकीटे  बाहेर काढायला सुरवात केली ते बघून अनय खालच्या कप्प्यातून बाकीच्या वस्तू बाहेर काढू लागला .दोघंही नुसतच काढत असते तर ठीक होतं  पण बाहेर काढून फेकून देत होते दोघं हुशार ! मी तिथे पोहोचेपर्यन्त फ्रिज च्या दाराचे खालच...

खरेदी आणि राम

पहिल्यांदा राम ला एका सुपरशॉप मध्ये घेऊन गेलो होतो, जिथे ट्रॉली मधून सामान घेऊन शेवटी बिल करायचं असतं. राम नी पहिल्यांदाच बघितलं होतं की सगळ्या वस्तू आपल्या उंचीएवढ्या जागेवर आहेत आपण हव्या त्या घेऊ शकतो मी बास्केट घेतली, त्यालापण त्याची वेगळी हवीच होती म्हणलं काय हरकत आहे,आम्ही घेऊ दिली तो शांतपणे बास्केट ढकलत ढकलत चॉकलेट्स आणि कॅडबरी ठेवलेल्या रॅक जवळ गेला आणि एक-एक कॅडबरी उचलून बास्केट मध्ये भरू लागला मी हवं ते सामान घेऊन बिलिंग कॉउंटरपाशी आले तो पर्यन्त या साहेबांचं अर्धं रॅक बास्केट मध्ये टाकून झालं होत प्रणव त्याच्याकडे कौतुकाने पाहत होता आणि दुकानातली बाकीची लोकं त्या दोघांकडे हसून पाहत होती ! "यातलं एकच न्यायच आहे बरंका आपल्याला !" माझ्या या वाक्यावर राम नी  फक्त माझ्याकडे बघितलं आणि तो पुन्हा चॉकलेट्स भरण्यात मग्न झाला. मला आणि प्रणव ला कळून चुकलं  होतं की  हे इतक्या सहज संपणारं नाहीये. आता याच रूपांतर रडारड ,गोंधळ यात ....  ते पण सार्वजनिक ठिकाणी होणार आहे. दुकानातल्या बाकीच्यांना पण हे लक्षात आलं होतंच . तरीपण मी शक्य तितक्या शांततेत आपल्याला बाहेर पडायच् ...

असा हा म्हणून अशी मी !

  " पंखा कुठेय पंखा ??" या प्रश्नाचं जवळ जवळ ७-८ वेळा "वर !!" असं उत्तर देऊन झाल्यावर ९ व्यांदा " पंखा कुठेय पंखा ?" ला मक्ख चेहऱ्याने " जागेवर !! " असं उत्तर राम कडून ऐकल्यावर , वेड लावण्याच्या वयातल्या मुलांना विचार करता येतो हे समजलं.मी राम ला म्हणलं "राम तो कृष्ण बाप्पा बघ कसा छान भरपूर लोणी खातो मग त्याला शक्ती येते ,घे तू पण थोडासा खा तुला पण शक्ती येईल "!! यावर राम  "आई , कृष्ण बाप्पा बघ माती पण खातोय "!! पुढे तो गप्प बसला पण मी मनातल्या मनात पुढचं वाक्य पूर्ण करून डोक्याला हात लावला ! राम च्या वागण्यातून बोलण्यातून तो एखादी गोष्ट करण्याबाबत किती स्पष्ट आहे हे मला पदोपदी जाणवलं कारण विचारलेल्या प्रश्नांची तो कधीच उत्तरं टाळत नाही , भावनिक अत्याचार पण फारसा करू देत नाही कोणाला स्वतःवर, गाडीवर येण्याचा हट्ट करू नये म्हणून रामचा  बाबा त्याला म्हणाला  कि "आई आणि आज्जीला नीट घेऊन जा हं  रिक्षातून !" तर याने शांतपणे उत्तर दिल ,"ड्राइवर घेऊन जाईल ना !"आम्ही दोघानी एकमेकांकडे बघितलं  हो म्हणलो आणि शांत बसलो...

मैत्र जीवांचे

Image
दुसऱ्या वर्षांपासून मुलांची मैत्री सगळ्यात आधी होते ती त्यांच्या खेळण्यांबरोबर ! राम कडे  खुप खेळणी आहेत तरीपण त्याची सगळ्यात आधी मैत्री झाली ती त्याच्यापेक्षा ८ वर्ष मोठ्या असणाऱ्या मुलांबरोबर, लॉकडाउन च्या काळात ह्या मुलांची ऑनलाइन शाळा संपली की सगळी सेना एका मजल्यावर जमायची आणि क्रिकेट, आंधळी कोशिंबीर पासून अगदी अप्पारप्पी पर्यन्त सगळे खेळ त्या छोट्याश्या जागेत खेळायचे कारण मैदानावर जायला आणि सोसायटी मध्ये फिरायला मनाई होती. राम एकदम खुश सगळ्यांना खेळताना बघून! खुप हसला, ओरडला, दोन्ही हात वर करून ये केलं ! त्या मुलांना पण राम आवडला. मी एक दिवस त्या सगळ्यांना घरी बोलावलं , मग काय रोजचा जमायचा अड्डाच बनून गेला रामचं  घर!! कारण या मुलांना गोंधळ घालतात म्हणून सगळेच "आपल्या आपल्या घरी जा!" असं  सांगून पळवून लावायचे मी आणि प्रणव नी  मात्र तसं नई केलं , त्या सगळ्यांना इतका आवडलं  ते आणि अर्थात, राम पण ! रामला पण सगळी मुलं खूप आवडली तो त्यांच्याशी खूप मस्ती करायचा आणि त्या सगळ्यांनी सुद्धा राम ला त्याच्या कलानी घेऊन खेळवलं , त्यांच्या येण्यामुळे राम एकलकोंडा होईल की ...

राम ची शाळा

Image
 तिसऱ्या वयात येईपर्यंत अजून एक मोठी घटना राम च्या आयुष्यात घडली ती म्हणजे शाळा !! तिकडे फी भरेपर्यंत सगळे म्हणले ,"का इतक्या लवकर त्याच्यामागे शाळा लावतेस  प्ले ग्रुप का असेना ,पुढे आहेच कि आयुष्यभर !!" माझी मानसिक तयारी झालेली असूनही , दोन ते तीन तासांसाठी घराच्या बाहेर राहणं ते अगदी अनोळखी ठिकाणी ही  त्यांच्या आयुष्यातली खुप मोठी गोष्ट असते , हे मला राम ला पहिल्या दिवशी शाळेत सोडताना समजलं . ब्लॉसम प्रीस्कूल ला मी २०११ पासून पाहत होते, तेव्हा मी पदवी चा अभ्यास करत होते , योगायोगाने इथेच राम ला पण जाता आलं याचं मला समाधान आहे . पहिल्याच दिवशी शाळेतून " तुमच्या मुलाला उलटी झालीये रडून, त्याला घेऊन जा!!" असा फोन आल्यावर मला लक्षात आलं, माझ्या आईसाठी मला शाळेत पाठवणं जेवढा सोप्पं गेलं होत तेवढच मला राम ला शाळेत पाठवणं अवघड जाणार ! तेव्हा विचार देखील आला डोक्यात "घाई करतीये का मी" पण ब्लॉसम प्रीस्कूल च्या टोळ मॅडम नी मला खूप छान सांगितलं कि २ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाला प्ले ग्रुप ला का टाकावं ते मला थोडं नंतर म्हणजे, त्याच्या घरातल्या  खोड्या वाढायला लागल्या...

मुलगा माझा कामाचा.

Image
 त्याच्यासमोर मेथी निवडायला बसल्यावर तो पण हळूच जवळ आला मी म्हणलं " हे बघ अशी पानं वेगळी कर आणि देठं वेगळी ठेव !" त्यानी सुरवात केली छान करत होता , मग बाबानी त्याला विचारलं , " तू काय करतोय " मेथी तोडतोय ", बाबा नि पुढे विचारलं " याच आपल्याला आता काय करायचं आहे ?" तो म्हणाला " यात जिरे घालायचे , मोहोरी घालायची.." बाबा म्हणाला "अअअ  मग काय करायचं ?" यावर तो म्हणला "मग हळद टाकायची .." बाबा ला पण मज्जा वाटू लागली होती, बाबा नि पुढे विचारला मग कायय करणार तु याचं ??" तर तो म्हणला" मेथीची भाजीची   कोशिंबीरचं करून टाकणार मी याची "! आम्ही सगळे खूप हसलो .. त्याला जवळ घेतल , शाब्बास म्हणलं , पप्प्या घेतल्या ,नुसती मज्जा ..!!! या वयातल्या मुलांच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. हा फोडणी घालायला कधी शिकला मलाही समजलं  नाही खुप बारीक लक्ष असतं  त्याच असं  त्याच्या प्ले ग्रुप च्या शिक्षिका पण म्हणल्या मला  पण हा स्वयंपाकातल्या गोष्टीकडे पण बारीक लक्ष ठेवतो हे बघून मला खूप कौतुक वाटलं त्याचं . . वयाच्या तिसऱ...

माझा मुलगा उद्योगपती

 कोणाचंही लक्ष नाही असा बघून करायच्या गोष्टी ह्या तिसऱ्या वयामध्ये कोणीतरी रात्रीतून येऊन वरदान देऊन जावं , तसं  या मुलांना जमायला लागतात , घरात कोणाचं ही  असा काहीही बघितलेला नसतं  तरीपण ते या मुलांना आपोआप कसं  जमतं  याच कोडं  मला अजूनतरी उलगडलेलं नाही.  टोमॅटो सॉस च टेट्रापॅक च झाकण उघडून राम नी तो फारशीवर ओतला मग त्यात हात घालून  फरशीवर सारावला ... मग त्याच हातानी पायावर मॉईस्टच्युराईसर सारखं चोळला , हे सगळं स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून चाललेला होतं आवाज नाही एकदम  शांतता घरात..!. मी बेडरूम मध्ये शोधला गॅलरी मध्ये जाताना स्वयंपाकघरात पांढरीशुभ्र फारशी लाल भडक दिसल्यावर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ! धावत पळत गेल्यावर आधी मी टेट्रापॅक वरती ठेवला ,सॉस नि माखलेला राम बघून अंघोळ घालावी लागणार, राम ला पण स्वयंपाकघराला पण  विचारांनीच दमायला झालं मला !! ते आवरण्यामध्ये मी बिझी आहे हे बघून हळूच बाथरूम मध्ये गेला आणि नळ चालू केला बादलीत पाणी भरलं आणि तोंडानी "रोव रोव रोव युअर बोट " गाणं म्हणत होता मला वाटलं बेडरूमध्येच खेळतोय काम उरकू...