उन्हाळ्याची सुट्टी भाग -३

पाणी खेळणं हा या वयातल्या मुलांचा अत्यंत आवडीचा उद्योग असतो वेगवेगळ्या मार्गानी राम ला बाथरूम मध्ये तरी जायचं असतंच नाहीतर मठाचा नळ तरी सोडायचा असतो , किंवा प्यायला ग्लास भरून घ्यायचं अर्धाच किंवा त्यापेक्षा कमी प्यायचं उरलेलं खेळायला घ्यायचं .. हा एक दिनक्रम रोजचा सुरु झालेला होता सुट्टी संपायला किती दिवस उरलेत हे मी रोज बघत होते. कुठून नवीन नवी आयडिया शोधून काढतो राम कधी कधी फार कौतुक वाटतं  त्याच.. पण नंतरचा पसारा आवरताना मात्र सगळं कौतुक निघून जातं . दुपारचे साधारण १२:३० वाजले होते उन्हाचा पारा वाढलाय अशी बातमी टीव्ही वर चालू होती इकडे राम नि ग्लास भरून माठातील पाणी घेतल गॅलरी मध्ये जाऊन ओतलं , सगळे कपडे काढ्ले आणि त्या पाण्यात जाऊन बसला मी कामात होते माझं याकडे लक्षच नव्हतं थोडावेळ बसून त्यात लोळायला लागला आणि आनंदाने ओरडायला पण लागला मग मी विचार केला इतका कसला आनंद झालाय याला... येऊन बघते तर साहेब गॅलरी मध्ये ओतलेला पाण्यात पोहायची ऍक्टिंग करत होते .                     "काय करतोयस ?" असं मी शांतपणे विचारलं तर गळ्यातला धागा तोंडात घालत मला म्हणला गार पाण्यात पोहायला छान वाटतं मी बेबी शार्क आहे " मी त्याला अज्जिबात ओरडले नाही कारण गॅलरी मध्ये एवढ्या उन्हाच्या झळा येतात की पाणी आपोआप वाळून जातं , "ग्लास भर पाण्यानी काय होतंय खेळतोय तर खेळू दे !" या प्रणव च्या सल्ल्यावर मी शांत बसले ,पण  भरलेला माठ ५ वाजताच अर्ध्याच्या खाली गेल्यावर लक्षात आलं  फक्त ग्लासभर पाणी नव्हतं ते!! मग पाणी खेळण्याचा उद्योग रोज दुपारच्या वेळेत घडू लागला आणि त्याच आठवड्यापासून सोसायटी मध्ये पाणीटंचाई पण सुरु झाली आता मात्र राम ला आवरणं गरजेचं झालं होत "राम , तू ओतलेलं  पाणी वळून जातंय म्हणजे सूर्य बाप्पा त्या पाण्याची वाफ करतोय, ती वाफ वरती सुर्यबाप्पा कडे निघून जाते... तू असाच ओतत राहिला पाणी तर घरातललं  पाणी संपून जाईल ना.. मग बिल्डिंग मधला संपून जाईल.. मग धरणातील संपून जाईल.. आपल्या पृथ्वी वरचच संपून जाईल ...अस म्हणत म्हणत त्याच पाणी खेळणं  खूप कमी केलं  , तरीपण अंगावर ओतून घेणं, पिताना  सांडणे या थोड्याफार घटना वरचेवर घडतातच... 



 मला वाटतं की ज्या दिवशी पाणी येणार नसेल त्याच दिवशी नेमकं आपल्याला जास्त पाणी लागतं किंवा काही कारणामुळे सांडतं वाया जात आणि त्याची हळहळ वाटते !सगळ्यात जास्त कहर एक दिवशी राम आला आणि विचारला आज पाणी आलाय का आई मी म्हणलं " हो आलंय मग त्यांनी एक ग्लासेस माठातलं पाणी भरून घेतलं बाथरूम समोरच्या पसे मध्ये ओतलं आणि त्यामध्ये घासरगुंडी वरून घसरतो तसं  पाय उचलून बुडावर घसरायचा प्रयत्न करत होता , एका क्षणी घसरला तो ....  आपटलंच असत डोकं फरशीवर पण सावरलं त्यानी स्वतःला. मला त्याची ही कसरत बघून इतकं आश्चर्य वाटलं आणि भीती सुद्धा ! कुठूनतरी पाणी खेळायचा चान्स शोधायचा एवढंच दिवसभराचं काम असायचं त्याच, मग झाडांनाच पाणी घालेल, देवांना अंघोळ घालेल सायकल ला  अंघोळ  घालेल . अगदीच काहीही  जमलं नाही किंवा आम्ही संधीच मिळू दिली नाही तर फ्रिज च दार उघडून त्यासमोर उभं राहणं हा पण एक आवडता उपक्रम बरेच दिवस हाती घेतलेला होता. आणि माझं दिवसभर , " अरे नको रे राम, नाही रे राम , हे नको करुस...  ते नको ओतूस .!".. खूप कामाची आवड आहे त्याला आणि आईला कमला लावायची जास्त आवड आहे असं मला वाटतं , त्याची उन्हाळ्याची सुट्टी मजेत चालली होती.. माझी उन्हाळ्याची सुट्टी मात्र फारच दमवणारी ठरली हे मात्र नक्की .. 

Comments

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

रामची सायकल