Posts

Showing posts from April, 2023

खरेदी आणि राम

पहिल्यांदा राम ला एका सुपरशॉप मध्ये घेऊन गेलो होतो, जिथे ट्रॉली मधून सामान घेऊन शेवटी बिल करायचं असतं. राम नी पहिल्यांदाच बघितलं होतं की सगळ्या वस्तू आपल्या उंचीएवढ्या जागेवर आहेत आपण हव्या त्या घेऊ शकतो मी बास्केट घेतली, त्यालापण त्याची वेगळी हवीच होती म्हणलं काय हरकत आहे,आम्ही घेऊ दिली तो शांतपणे बास्केट ढकलत ढकलत चॉकलेट्स आणि कॅडबरी ठेवलेल्या रॅक जवळ गेला आणि एक-एक कॅडबरी उचलून बास्केट मध्ये भरू लागला मी हवं ते सामान घेऊन बिलिंग कॉउंटरपाशी आले तो पर्यन्त या साहेबांचं अर्धं रॅक बास्केट मध्ये टाकून झालं होत प्रणव त्याच्याकडे कौतुकाने पाहत होता आणि दुकानातली बाकीची लोकं त्या दोघांकडे हसून पाहत होती ! "यातलं एकच न्यायच आहे बरंका आपल्याला !" माझ्या या वाक्यावर राम नी  फक्त माझ्याकडे बघितलं आणि तो पुन्हा चॉकलेट्स भरण्यात मग्न झाला. मला आणि प्रणव ला कळून चुकलं  होतं की  हे इतक्या सहज संपणारं नाहीये. आता याच रूपांतर रडारड ,गोंधळ यात ....  ते पण सार्वजनिक ठिकाणी होणार आहे. दुकानातल्या बाकीच्यांना पण हे लक्षात आलं होतंच . तरीपण मी शक्य तितक्या शांततेत आपल्याला बाहेर पडायच् ...

लांब फिरायला .....

Image
"राम कुठे जायचं ?" असं विचारलं  कि एकच उत्तर यायचं त्याच्याकडून...  "लांब फिरायला..!" पण किती लांब ते मात्र आम्हीच ठरवत होतो ! १ ते  २ वर्षांच्या मुलांना प्रवासाला घेऊन जाणे म्हणजे खूप डोकेदुखी ! असा सल्ला मला जवळ जवळ सगळ्यांनी दिला. बाबा तर म्हणाले, " सहल फक्त २० % तुमची असेल ते पण पोरं झोपल्यावर आणि उरलेली ८०% फक्त पोरांची असेल ,यात त्याचे मूड्स त्यांचा कम्फर्ट त्यांचं  खाणं, पिणं, झोपणं आणि खेळणं, खेळताना त्यांना सांभाळणं सगळंच.... ! आणि तुम्ही दोघेच असाल आणि आपलं हे वादळ कसं  हे तुला तर नीट माहितीय !!" पण मला मनापासून काही पटत नव्हतं मला तो अनुभव घ्यायचाच होता, खरंच इतकी डोकेदुखी असेल का? होईलही किंवा होणार पण नाही ! आम्ही निर्णय घेतला जाऊयात ...  आमच्या सगळ्यात जवळचे  मित्र मैत्रीण आणि त्यांची ८ महिन्याची मुलगी देखील आमच्या सोबत होते. हि सहल खरंतर मुलांपेक्षा आमच्यासाठी महत्वाची होती कारण पोरं झाल्यापासून घराबाहेर पडलोच नव्हतो , निवांत वेळच घालवता आलेला नव्हता , पण ती मुलांसाठी जास्त  महत्वाची ठरली .  तशी खूप तयारी करून गेलो होतो मनाची आ...

असा हा म्हणून अशी मी !

  " पंखा कुठेय पंखा ??" या प्रश्नाचं जवळ जवळ ७-८ वेळा "वर !!" असं उत्तर देऊन झाल्यावर ९ व्यांदा " पंखा कुठेय पंखा ?" ला मक्ख चेहऱ्याने " जागेवर !! " असं उत्तर राम कडून ऐकल्यावर , वेड लावण्याच्या वयातल्या मुलांना विचार करता येतो हे समजलं.मी राम ला म्हणलं "राम तो कृष्ण बाप्पा बघ कसा छान भरपूर लोणी खातो मग त्याला शक्ती येते ,घे तू पण थोडासा खा तुला पण शक्ती येईल "!! यावर राम  "आई , कृष्ण बाप्पा बघ माती पण खातोय "!! पुढे तो गप्प बसला पण मी मनातल्या मनात पुढचं वाक्य पूर्ण करून डोक्याला हात लावला ! राम च्या वागण्यातून बोलण्यातून तो एखादी गोष्ट करण्याबाबत किती स्पष्ट आहे हे मला पदोपदी जाणवलं कारण विचारलेल्या प्रश्नांची तो कधीच उत्तरं टाळत नाही , भावनिक अत्याचार पण फारसा करू देत नाही कोणाला स्वतःवर, गाडीवर येण्याचा हट्ट करू नये म्हणून रामचा  बाबा त्याला म्हणाला  कि "आई आणि आज्जीला नीट घेऊन जा हं  रिक्षातून !" तर याने शांतपणे उत्तर दिल ,"ड्राइवर घेऊन जाईल ना !"आम्ही दोघानी एकमेकांकडे बघितलं  हो म्हणलो आणि शांत बसलो...

मैत्र जीवांचे

Image
दुसऱ्या वर्षांपासून मुलांची मैत्री सगळ्यात आधी होते ती त्यांच्या खेळण्यांबरोबर ! राम कडे  खुप खेळणी आहेत तरीपण त्याची सगळ्यात आधी मैत्री झाली ती त्याच्यापेक्षा ८ वर्ष मोठ्या असणाऱ्या मुलांबरोबर, लॉकडाउन च्या काळात ह्या मुलांची ऑनलाइन शाळा संपली की सगळी सेना एका मजल्यावर जमायची आणि क्रिकेट, आंधळी कोशिंबीर पासून अगदी अप्पारप्पी पर्यन्त सगळे खेळ त्या छोट्याश्या जागेत खेळायचे कारण मैदानावर जायला आणि सोसायटी मध्ये फिरायला मनाई होती. राम एकदम खुश सगळ्यांना खेळताना बघून! खुप हसला, ओरडला, दोन्ही हात वर करून ये केलं ! त्या मुलांना पण राम आवडला. मी एक दिवस त्या सगळ्यांना घरी बोलावलं , मग काय रोजचा जमायचा अड्डाच बनून गेला रामचं  घर!! कारण या मुलांना गोंधळ घालतात म्हणून सगळेच "आपल्या आपल्या घरी जा!" असं  सांगून पळवून लावायचे मी आणि प्रणव नी  मात्र तसं नई केलं , त्या सगळ्यांना इतका आवडलं  ते आणि अर्थात, राम पण ! रामला पण सगळी मुलं खूप आवडली तो त्यांच्याशी खूप मस्ती करायचा आणि त्या सगळ्यांनी सुद्धा राम ला त्याच्या कलानी घेऊन खेळवलं , त्यांच्या येण्यामुळे राम एकलकोंडा होईल की ...

राम ची शाळा

Image
 तिसऱ्या वयात येईपर्यंत अजून एक मोठी घटना राम च्या आयुष्यात घडली ती म्हणजे शाळा !! तिकडे फी भरेपर्यंत सगळे म्हणले ,"का इतक्या लवकर त्याच्यामागे शाळा लावतेस  प्ले ग्रुप का असेना ,पुढे आहेच कि आयुष्यभर !!" माझी मानसिक तयारी झालेली असूनही , दोन ते तीन तासांसाठी घराच्या बाहेर राहणं ते अगदी अनोळखी ठिकाणी ही  त्यांच्या आयुष्यातली खुप मोठी गोष्ट असते , हे मला राम ला पहिल्या दिवशी शाळेत सोडताना समजलं . ब्लॉसम प्रीस्कूल ला मी २०११ पासून पाहत होते, तेव्हा मी पदवी चा अभ्यास करत होते , योगायोगाने इथेच राम ला पण जाता आलं याचं मला समाधान आहे . पहिल्याच दिवशी शाळेतून " तुमच्या मुलाला उलटी झालीये रडून, त्याला घेऊन जा!!" असा फोन आल्यावर मला लक्षात आलं, माझ्या आईसाठी मला शाळेत पाठवणं जेवढा सोप्पं गेलं होत तेवढच मला राम ला शाळेत पाठवणं अवघड जाणार ! तेव्हा विचार देखील आला डोक्यात "घाई करतीये का मी" पण ब्लॉसम प्रीस्कूल च्या टोळ मॅडम नी मला खूप छान सांगितलं कि २ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाला प्ले ग्रुप ला का टाकावं ते मला थोडं नंतर म्हणजे, त्याच्या घरातल्या  खोड्या वाढायला लागल्या...

मुलगा माझा कामाचा.

Image
 त्याच्यासमोर मेथी निवडायला बसल्यावर तो पण हळूच जवळ आला मी म्हणलं " हे बघ अशी पानं वेगळी कर आणि देठं वेगळी ठेव !" त्यानी सुरवात केली छान करत होता , मग बाबानी त्याला विचारलं , " तू काय करतोय " मेथी तोडतोय ", बाबा नि पुढे विचारलं " याच आपल्याला आता काय करायचं आहे ?" तो म्हणाला " यात जिरे घालायचे , मोहोरी घालायची.." बाबा म्हणाला "अअअ  मग काय करायचं ?" यावर तो म्हणला "मग हळद टाकायची .." बाबा ला पण मज्जा वाटू लागली होती, बाबा नि पुढे विचारला मग कायय करणार तु याचं ??" तर तो म्हणला" मेथीची भाजीची   कोशिंबीरचं करून टाकणार मी याची "! आम्ही सगळे खूप हसलो .. त्याला जवळ घेतल , शाब्बास म्हणलं , पप्प्या घेतल्या ,नुसती मज्जा ..!!! या वयातल्या मुलांच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. हा फोडणी घालायला कधी शिकला मलाही समजलं  नाही खुप बारीक लक्ष असतं  त्याच असं  त्याच्या प्ले ग्रुप च्या शिक्षिका पण म्हणल्या मला  पण हा स्वयंपाकातल्या गोष्टीकडे पण बारीक लक्ष ठेवतो हे बघून मला खूप कौतुक वाटलं त्याचं . . वयाच्या तिसऱ...

माझा मुलगा उद्योगपती

 कोणाचंही लक्ष नाही असा बघून करायच्या गोष्टी ह्या तिसऱ्या वयामध्ये कोणीतरी रात्रीतून येऊन वरदान देऊन जावं , तसं  या मुलांना जमायला लागतात , घरात कोणाचं ही  असा काहीही बघितलेला नसतं  तरीपण ते या मुलांना आपोआप कसं  जमतं  याच कोडं  मला अजूनतरी उलगडलेलं नाही.  टोमॅटो सॉस च टेट्रापॅक च झाकण उघडून राम नी तो फारशीवर ओतला मग त्यात हात घालून  फरशीवर सारावला ... मग त्याच हातानी पायावर मॉईस्टच्युराईसर सारखं चोळला , हे सगळं स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून चाललेला होतं आवाज नाही एकदम  शांतता घरात..!. मी बेडरूम मध्ये शोधला गॅलरी मध्ये जाताना स्वयंपाकघरात पांढरीशुभ्र फारशी लाल भडक दिसल्यावर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ! धावत पळत गेल्यावर आधी मी टेट्रापॅक वरती ठेवला ,सॉस नि माखलेला राम बघून अंघोळ घालावी लागणार, राम ला पण स्वयंपाकघराला पण  विचारांनीच दमायला झालं मला !! ते आवरण्यामध्ये मी बिझी आहे हे बघून हळूच बाथरूम मध्ये गेला आणि नळ चालू केला बादलीत पाणी भरलं आणि तोंडानी "रोव रोव रोव युअर बोट " गाणं म्हणत होता मला वाटलं बेडरूमध्येच खेळतोय काम उरकू...