रामची सायकल

सायकल घेऊन देताना रामपेक्षा जास्त आनंद मला आणि प्रणव ला झाला होता मला ३ री मध्ये असताना मिळाली होतोय आणि याला ३ वर्षांचा असतानाच मिळालीये ..!! त्यादिवशी सायकल घरी घेऊन येतानाच तो झोपून गेला ते थेट दुसऱ्यादिवशी सकाळीच जाग आली त्याला.. उठल्या उठल्या आधी गॅलरी मध्ये गेला सायकल दिसल्यावर  राम चा आनंद बघण्यासारखा होता.. सगळ्या घरात सायकल  फिरवत होता पूर्ण पँडल  मारता येत नव्हतं पण प्रयत्न पूर्ण करत होता ... सगळ्यांना त्याची सायकल दाखवली हाक मारून मारून.!!. सायकल ला मागे एक सीट आहे त्यावर अनय बसणार हे त्याच त्यानी पक्क करून सगळ्यांना सांगून टाकलं .. "मी बसू का?" असं  काव्या नि विचारलं .. मी समोरच उभी होते म्हणलं बघू काय म्हणतोय , तर चक्क " हो..  तू मागे बस आता अनय नाहीये तर .. शेअरिंग  इस कॅरिंग !" मी पण एक्दम उत्साहात "व्हेरी गुड राम !" असा म्हणलं . त्या दिवशी रात्रीच त्या सायकल चं  सगळं प्लास्टिक च कव्हर काढून फेकून देण्यात आलं मगच स्वारी झोपायला गेली . आता शाळा सुरु व्हायला थोडेच दिवस शिल्लक राहिले होते .. ३-४ दिवसातच तो पूर्ण पेंडल मारायला लागला . !! रोज उठून तेच तेच ब्लॉक्स , पाईप्स , हे जोड ते जोड, पैंटिंग .. सगळं सगळं करून झालेल होतं .. शाळा नवीन असणार होती.. मोठी!!  त्याची सवय लागावी आणि रडारड होऊ नये यासाठी शाळेच्याच आवारातील डे केअर शोधलं आणि तिथे १५ दिवस  तरी राम नि जायला काही हरकत नाही असं ठरवून त्याला घातलं . तो पण आनंदानी तयार झाला .  घरात खूपच बोअर झाला होता बिचारा ! पहिलाच दिवस होता डे केअर चा निघतानाच ती सायकल दिसली ..आणि मला सायकल वरूनच शाळेत जायचं म्हणून बसला .. खुप्प समजावलं .. पण नाहीच ऐकायच नाही !! शेवटी खालपर्यन्त सायकल घेऊन गेलो  आम्ही.. मी गाडी कडे जात जात म्हणलं ,"कोण आधी .. गाडी वर बसतेय.. त्याचा फर्स्ट नंबर .!!!". लगेच बाकी सगळं विसरून.. सायकल तिथेच सोडून .. स्वारी गाडी वर चालून उभी राहिली... "मीच फर्स्ट !!" आमचं काम लगेच झालं  होतं .. आणि तीच आमची विजयपताका !! 


सायकल खूपच आवडली त्याला. आणि त्याला चालवायची असते म्हणजे ते असं असतं  की  राम सायकल वर असतो पेंडल मारत असतो.. मी मागून सायकल  पकडते फक्त आणि त्याच्यावेगानी पळत असते .. असं एकदा आम्ही रुणवाल  ते भीमसेन जोशी गेलो होतो.. अर्धा रास्ता चढाचा अर्धा रास्ता उताराचा .. असा तो प्रवास झाला आमचा.. तो चढावर पेंडल मारून दमला मी उतारावर वेग आवरून आणि पळून दमले.. आम्ही दोघंही दमलो.! आणि मी मनातल्या मनात ठरवलं सायकल घेऊन राम बरोबर जेवढा आपल्याला झेपेल तेवढच जायचं.. जेवढी त्याची इच्छा असेल तेवढं नाही... !!  मामाच्या घरून आमच्या घरी येतना  थोडा चढ आणि थोडा उतार  असं आहें तर एकदा त्या रस्त्यावर मागचा हात सोड म्हणून हट्ट धरला.. मी सोडणार नव्हतेच.. कारण ब्रेक दाबायचा अजून समजत नाही ! उतारावर पण पेंडल मारतो तो.. सायकल अजून जोरात पळते आणि वेग आवरता येत नाही. .. तरीही.. मला अनन्या सारखी एकट्याला चालवायची आहे  तू सोडच !! मागेच लागला.. मग मी दिलं सोडून.. पण मागे पळतच होते उतार  थोडाच होता पण सायकल माझ्यापेक्षा जास्त वेगात पुढे चालली होती.. पुढे गेल्यावर एक चारचाकी पार्क केली होती.. " हॅन्डल वळवा .. ब्रेक दाबा .." असा खुप्प ओरडून झाला पण काय करायचंय हे संजयच्या आतच तो त्या कार ला जाऊन धडकला आणि सायकल सहीत पडला ... वेडावाकडा !! मी जाऊन उचलेपर्यन्त त्यानी आवाज काढला नाही तोंडातून मी उचलल्यानंतर रडायला सुरवात केली.. त्याला लागलं  नाही.. खरचटलं पण नाही.. नशीब !! दुसऱ्या वेळेस पण असच घडलं .. हात सोडायचं हट्ट उतारावरुन पूर्ण वेगात सायकल .. या वेळेस उत्तर खूपच तीव्र होता त्यामुळे माझा पाळण्याचा वेग आणि त्याच्या सायकल चा वेग जुळू शकला नव्हता .. रास्ता इतका ओला आणि शेवाळलेला  होता ... ऐनवेळेस समोरून बाबा आले आणि त्यांनी पूर्ण जीवानिशी सायकल पकडली आणि या वेळेस पण मोठा अपघात टळला .!! मी आणि बाबा आम्ही दोघे घाबरलेलो.. आम्हाला दोघांना धाप लागलीये.. आणि हा मुलगा जोर जोरात हसत होता घंटी वाजवत ! त्याला समजल पण नाही की  काय होणार होतं  ... बाबांची नीट बोलणी खाल्ली मी !. राम नि पण खाल्ली हसत हसत.. कारण त्याला समजलच नाही कँडी चे आबा का चिडलेत.. रात्री झोपताना विचारला राम नि मला , " कँडी चे आबा मला काय म्हणत होते ?" आता या वर मी सगळं सांगत बसण्यापेक्षा एवढंच सांगितलं कि उतारावर पेंडल मारायचं नसत .  ब्रेक दाबायचा असतो आणि घंटी पण वाजवायची असते..नंतर २-३ वेळा सायकल घेऊन आम्ही बाहेर पडलो .. परत  कधी तसं  घडलं  नाही .आता रोजच खेळायच्या वेळेला पाऊस असतो .. घरातल्या घरात राम सायकल चालवतो कधी दारासमोरच्या मोकळ्या जागेत .. आता  मात्र अजून सायकल आमच्या घरातच  आहे .. आणि वाट बघतीये परत कधी राम मला खाली नेतोय ... 

Comments

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २