उन्हाळ्याची सुट्टी भाग - ५
संध्याकाळचे ७:३० वाजलेले .. आज राम खेळून आला घरात .. बूट काढले पाणी प्यायला आणि बेडरूम मध्ये गेला .. मी स्वयंपाकघरात त्याच्यासाठी जेवण बनवत होते, मेथीचे पराठे .. छान कणिक भिजवलेली होती.. प्रणव ची मीटिंग चालू होती. आई पेपर वाचत होत्या हॉल मध्ये .. सगळं शांत ... सुरळीत !!.. मी हा वेळ चांगला १५ मिनिटे अनुभवला .. इतकं छान वाटलं शांत .. पळापळी नाही ! आरडा ओरडा नाही..! पण १६ व्या मिनिटाला हीच शांतता मलाच खायला उठली.. एवढा शांत .!. ते पण राम घरात असताना .! काहीतरी अजब आहे.. ही चांगली शांतता नाहीये .. किंवा यावेळेला ही शांतता चांगली नाहीये !!! काहीतरी गडबड आहे.. हात धुवून मी बेडरूम मध्ये गेले तर महाशय बाथरूम मध्ये होते .. माझा साबण जो बेसिन वर होता तो .. बाथरूम मधल्या स्टूल वर चढून यानी खाली काढला होता.. स्वयंपाकघरातून काटा चमचा कधी नेला होता मला अजूनही समजल नाही .. साबणाला काट्या चमच्याने भोसकून भोसकून त्याचा लगदा केलेला होता .. पूर्ण साबणाची वाडी वाया गेलेली मी बघितली आणि सगळी कडे साबण ..! हात तर बारबाटलेलेच होते पण त्याचे पांढरे छाप बेडरूम च्या भिंतीवर...!! वास्तुशांत झाल्यासारखे .. !फोटोतल्या कृष्णाच तोंड जस लोण्याने माखलेलं असत तसं राम च तोंड साबणाने माखलेलं होतं ...
ते बघून मला भीती वाटली "यानी खाल्लं कि काय?" पण तो नाही म्हणाला !!.. साबणाचा तो खेळ बाथरूम आणि आमच्या बेडरूम पर्यन्त मर्यादित राहिला असता तर मी कसातरी आवरला असता .. बेडरूम मी आवरायला घेतल्यावर त्याची वरात हॉल आणि स्वयंपाकघरात वळली. मग मला राग यायला सुरवात झाली.. हॉल मध्ये साबणाची पाऊलं उमटली होती.. बेडरूम ते हॉल.. मग स्वयंपाकघर असा त्याचा प्रवास झालाय हे पाऊलखुणा सांगत होत्या ..!. मी अक्षरशः पळतच स्वयंपाकघरात गेले तोपर्यंत साबणाचे हात कणकेला लागलेले होते मग मात्र मी ओरडलेच त्याच्यावर.. ओरडल्यावर स्वयंपाकधारातून पळ काढला त्यानी पण जाता जाता घासलेल्या डब्याला हात लावला. त्यावर साबणाच्या हाताचा छाप उमटला ..! धपाटा घालायला उचललेला हात त्याच्या पाटीवर पडायच्या ऐवजी डब्याच्या रॅक वर पडला आणि मलाच लागलं . तेवढ सगळं आवरायला , स्वयंपाक ,जेवण आणि रात्री च आवरून झोपायला मला दोन तास उशीर झाला .. हा पट्ट्या मात्र त्याच्या जेवायच्या वेळेत जेवण करून मस्त नेहमीच्या वेळेला गाढ झोपून गेला !!
संध्याकाळी खेळून आल्यानंतर देखील खुप खेळायची इच्छा असते .. राम कडे बघून असा वाटणारच नाही कि तो चांगला २ तास वगरे खेळून, पळापळी करून आलाय.. पण होतं काय घरी आल्यावर काव्या आणि अनन्या असतात खेळायला पण ८ वाजेपर्यंतच पण याच समाधान होत मनही खेळून . खेळायची शक्ती उरलेली असते मग जेवायला बसेपर्यन्त सुद्धा काय काय खेळता येईल किंवा करता येईल याचाच विचार तो करत असेल असं मला वाटत.. आणि मी विचार करत असते कि आटा जर त्यांनी काही काम वाढवून ठेवल तर मी स्वयंपाक झाल्यावर आवरू की आधीच आवरून ठेऊं मग स्वयंपाक करू? संध्याकाळी देखील वेळेची जुळवाजुळव करावीच लागते..त्याचा वेळ जात नाही हे लक्षात आलाय आमच्या पण त्यासाठी काय करता येईल यावर विचार करताना त्याला आपण सायकल घेऊन देऊ यावर माझा आणि प्रणव च एकमत झालं आणि ठरलं राम ला सायकल घ्यायची.. जेणेकरून त्याचा वेळ चॅन जाईल.. तो सायकल शिकेल आणि त्याचा व्यायाम पण होईल.. दमून आला की भूक पण लागेल जेवण करून , वेळेत झोपेल. खोड्या आणि पसारे वाले प्रयोग सुचणार नाहीत.
.jpeg)
Very nice as usual
ReplyDelete