उन्हाळ्याची सुट्टी भाग - २
मावशी बरोबर मनसोक्त चिखल खेळून झाल्यावर स्वारी तबला आणि पेटी कडे वळली. मावशीला त्याला मांडीवर बसवून त्याचसोबत पेटी वाजवण्यापेक्षा त्या पोसिशन मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट होता असं मला सुरवातीला वाटला पण नंतर दोघेही अगदी इंटरेस्ट घेऊन त्या पेटीवर काम करत होते तल्लीन होऊन चालेल होता कितीतरी वेळ , पेटीवर " असावा सुंदर चॉकलेट चा बांगला " वाजवून झालं, अर्थात कुणालाही समजल नसतंच ते , मग बाबा म्हणला " लट उलझी सुल्झ जा बालमा ..." ते वाजव पण नक्की काय वाजवायचा आहे कुणालाच समजलं नाही त्यामुळे परत ते दोघं 'सा रे ग म" वाजवायला लागले आणि मला किमान घरातला आणि बाथरूम मधला चिखल साफ करायला वेळ मिळाला . त्याला आवडत खरंतर पण अजून लहान आहे तो , त्या वाद्यांचा योग्य आदर करून ते नीट वाजवायला शिकला तर मला फारच आनंद होईल .
उन्हाळ्याची सुट्टी सुरु होऊन १५/२० झाले नसतील तोवरच आमच्या ज्ञानात नवीन भर पडली होती " बोर होतंय !" वय वर्ष ३ जेव्हा म्हणतात , बोअर होतंय त्यावर वय वर्ष ३०/६० असणार्यांनी काय उत्तर द्यायचं असतं बरं ?? मग मी अजून खेळ शोधून काढायला सुरवात केली , मामीनी गिफ्ट केलेले ब्लॉक्स खेळताना त्याचा मोठा ब्रिज बनवायचा आणि त्यावर इंग्लिश लेटर्स आणि मराठी अक्षरांची रेल्वे बनवायची तोंडानी म्हणत म्हणत, यामुळे आमची उजळणी पण झाली २-३ तास वेळ पण चांगला गेला , परत लगेच बोअर झालं आम्हाला, नंतर काय करायचं ?? दर ३ तासांनी नवीन उपक्रम त्याला द्याचा म्हणजे काम पुन्हा आईवरच . २-३ तासांचा उपक्रम झाल्यानंतर जेवण करून २-३ तास झोप होईल, उन्हं उतरली की बागेत घेऊन जायचं , असा माझ्या मनातला प्लॅन असायचा ! रोज मी हे ठरवायचे आणि राम रोज झोपायला ४ वाजवायचा आणि उठायला ६:३०/७:०० मग नंतर बागेत जाऊन खेळणं ... मग आल्यावर जेवण.! मग रात्रीचे १०:३०/११ व्हायचे झोपायला . दुपारचं जेवण झाल्यावर मोबाइल चार्ज झाल्यासारखी खेळायला कुठून शक्ती येते या मुलांना देवजाणे , बरं फक्त त्यांना खेळायची शक्ती आणि आपल्याला डोळे उघडे ठेवणं जड जावं एवढी झोप का यावी ?? मला कधी कधी हा आयांवर होत असलेला अन्याय वाटतो आपण आया झोपल्यावर हि पोरं शांतपणे खेळतील... अस नसतंच , भांडीच वाजव किंवा आपट ! , काठीच खेळ ... नाहीतर मग आहेच आवडीचं पाणी खेळणे !
बाथरूम मध्ये पाणी खेळणं बाथरूम पर्यंतच मर्यादीत राहिला असता तर माझी पाणी खेळायला काहीही हरकत नाही , (आम्ही पण लहानपणी खेळायचो की पाणी ) पण डोळ्यावर झोप असताना तोच घसरून पडेल या विचारांनी फारशी पुसणं हातात घेऊन घरभर फिरायला इतकं जीवावर येत म्हणून सांगू . राम ला कुठेतरी जाणवलं असेल की घरात ओलं करून काही उपयोग नाही; आई एक दिवस मलाच पुसायला लावणार!! म्हणून या साहेबांनी पाणी खेळणे हा उपक्रम गॅलरी मध्ये नेला तिथे एवढं ऊन असतं की आपोआप पाणी वाळून जात आणि आवरायला हॉल पेक्षा गॅलरी लहान असते त्यामुळे खेळ पण होतो, मज्जा पण येते , आईला पुसावा लागत नाही. एक दोन दिवस झालेत ... बाथरूम मधून पाणी नेणं अवघड जातंय राम ला. कधी दार बंद असतं तर कधी नेताना पाणी सांडत , गॅलरी पर्यंत भरलेली वाटी अर्धी होऊन जाते .. मी बघतीये .. थोडे सांडलेले पाणी पुसावंच लागतंय . मी मदत नाही केली त्याची अजून ... म्हणलं बघू त्याचा तोच उपाय शोधेल नाहीतर त्याच पाणी खेळणं बंद होईल ... शाळा सुरु व्हायची मी आतुरतेनं वाट पाहत आहे .


Comments
Post a Comment