Posts

Showing posts with the label parenting

रामची सायकल

Image
सायकल घेऊन देताना रामपेक्षा जास्त आनंद मला आणि प्रणव ला झाला होता मला ३ री मध्ये असताना मिळाली होतोय आणि याला ३ वर्षांचा असतानाच मिळालीये ..!! त्यादिवशी सायकल घरी घेऊन येतानाच तो झोपून गेला ते थेट दुसऱ्यादिवशी सकाळीच जाग आली त्याला.. उठल्या उठल्या आधी गॅलरी मध्ये गेला सायकल दिसल्यावर  राम चा आनंद बघण्यासारखा होता.. सगळ्या घरात सायकल  फिरवत होता पूर्ण पँडल  मारता येत नव्हतं पण प्रयत्न पूर्ण करत होता ... सगळ्यांना त्याची सायकल दाखवली हाक मारून मारून.!!. सायकल ला मागे एक सीट आहे त्यावर अनय बसणार हे त्याच त्यानी पक्क करून सगळ्यांना सांगून टाकलं .. "मी बसू का?" असं  काव्या नि विचारलं .. मी समोरच उभी होते म्हणलं बघू काय म्हणतोय , तर चक्क " हो..  तू मागे बस आता अनय नाहीये तर .. शेअरिंग  इस कॅरिंग !" मी पण एक्दम उत्साहात "व्हेरी गुड राम !" असा म्हणलं . त्या दिवशी रात्रीच त्या सायकल चं  सगळं प्लास्टिक च कव्हर काढून फेकून देण्यात आलं मगच स्वारी झोपायला गेली . आता शाळा सुरु व्हायला थोडेच दिवस शिल्लक राहिले होते .. ३-४ दिवसातच तो पूर्ण पेंडल मारायला लागला . !! रोज...

ब्रदर शार्क आणि बेबी शार्क

Image
"अनय माझा छोटा भाऊ आहे ! मी अनय चा दादा आहे " हे राम च्या डोक्यात इतकं पक्कं आहे की "अनय  बेबी शार्क आहे आणि मी ब्रदर  शार्क आहे !!" असं  तो मला नेहमी म्हणतो. मलाच काय पण त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांना, सोसायटी मधल्या मैत्रिणींना आणि मामाच्या घरी देखील सगळ्यांना  हेच सांगून ठेवलंय .त्यामुळे अनय  कोणालाही ओळखू दे किंवा न ओळखू दे,आमच्याकडे अनय ला सगळे ओळखतात. रामचा  प्रचंड जीव आहे त्याच्या अत्त्येभावावर .या भावंडामध्ये तस वर्षभराचच अंतर आहे त्यामुळे या दोघांचं एकमेकांशी छान जमेल असं मला आणि प्राचीला वाटतं . खोड्या काढण्यामध्ये अनय  जरा मागे असतो पण आपला दादा जे काही करतोय ते तो नीट लक्ष देऊन बघत असतो . रांगत जाऊन  हळूच जाऊन अनय नी फ्रिज उघडलेला पाहून चालत चालत  राम पण तिकडे गेला वरच्या बाजूच्या कप्प्यातून मसाल्याची पाकीटे  बाहेर काढायला सुरवात केली ते बघून अनय खालच्या कप्प्यातून बाकीच्या वस्तू बाहेर काढू लागला .दोघंही नुसतच काढत असते तर ठीक होतं  पण बाहेर काढून फेकून देत होते दोघं हुशार ! मी तिथे पोहोचेपर्यन्त फ्रिज च्या दाराचे खालच...