उन्हाळ्याची सुट्टी भाग -३
पाणी खेळणं हा या वयातल्या मुलांचा अत्यंत आवडीचा उद्योग असतो वेगवेगळ्या मार्गानी राम ला बाथरूम मध्ये तरी जायचं असतंच नाहीतर मठाचा नळ तरी सोडायचा असतो , किंवा प्यायला ग्लास भरून घ्यायचं अर्धाच किंवा त्यापेक्षा कमी प्यायचं उरलेलं खेळायला घ्यायचं .. हा एक दिनक्रम रोजचा सुरु झालेला होता सुट्टी संपायला किती दिवस उरलेत हे मी रोज बघत होते. कुठून नवीन नवी आयडिया शोधून काढतो राम कधी कधी फार कौतुक वाटतं त्याच.. पण नंतरचा पसारा आवरताना मात्र सगळं कौतुक निघून जातं . दुपारचे साधारण १२:३० वाजले होते उन्हाचा पारा वाढलाय अशी बातमी टीव्ही वर चालू होती इकडे राम नि ग्लास भरून माठातील पाणी घेतल गॅलरी मध्ये जाऊन ओतलं , सगळे कपडे काढ्ले आणि त्या पाण्यात जाऊन बसला मी कामात होते माझं याकडे लक्षच नव्हतं थोडावेळ बसून त्यात लोळायला लागला आणि आनंदाने ओरडायला पण लागला मग मी विचार केला इतका कसला आनंद झालाय याला... येऊन बघते तर साहेब गॅलरी मध्ये ओतलेला पाण्यात पोहायची ऍक्टिंग करत होते . "काय करतोयस ?" असं मी शांतपणे विचारलं तर गळ्यातला धा...