माझा मुलगा उद्योगपती
कोणाचंही लक्ष नाही असा बघून करायच्या गोष्टी ह्या तिसऱ्या वयामध्ये कोणीतरी रात्रीतून येऊन वरदान देऊन जावं , तसं या मुलांना जमायला लागतात , घरात कोणाचं ही असा काहीही बघितलेला नसतं तरीपण ते या मुलांना आपोआप कसं जमतं याच कोडं मला अजूनतरी उलगडलेलं नाही.
टोमॅटो सॉस च टेट्रापॅक च झाकण उघडून राम नी तो फारशीवर ओतला मग त्यात हात घालून फरशीवर सारावला ... मग त्याच हातानी पायावर मॉईस्टच्युराईसर सारखं चोळला , हे सगळं स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून चाललेला होतं आवाज नाही एकदम शांतता घरात..!. मी बेडरूम मध्ये शोधला गॅलरी मध्ये जाताना स्वयंपाकघरात पांढरीशुभ्र फारशी लाल भडक दिसल्यावर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला ! धावत पळत गेल्यावर आधी मी टेट्रापॅक वरती ठेवला ,सॉस नि माखलेला राम बघून अंघोळ घालावी लागणार, राम ला पण स्वयंपाकघराला पण विचारांनीच दमायला झालं मला !! ते आवरण्यामध्ये मी बिझी आहे हे बघून हळूच बाथरूम मध्ये गेला आणि नळ चालू केला बादलीत पाणी भरलं आणि तोंडानी "रोव रोव रोव युअर बोट " गाणं म्हणत होता मला वाटलं बेडरूमध्येच खेळतोय काम उरकून आत आले तर हे महाराज बादलीत बसलेले आणि रोव रोव करणारी बोट आमच्या मुसिक सिस्टिम चा रिमोट होता, ज्यातून पाणी निथळत होतं ! कसं बसं नादी लावून थोडा ओरडून थोडी भीती घालून त्याला बाहेर आणलं , कोरड केलं , खाऊ घालून झोपवत झोपवत मी सुद्धा गाढ झोपून गेले समजला देखील नाही.
या मुलांनी दिवसातून एकदाच खोडी करावी किंवा एकदाच एखाद काम वाढवून ठेवावं असा एखादा नियम किंवा ब्रेन प्रोग्रॅम डेव्हलप करता आला तर किती बरं होईल नाही का!! या खोड्यांमधून किंवा उद्योगांमधून त्याची डेव्हलोपमेंट होत असते हे मला अगदी मान्य पण ते आवरण्याचा नादात आईचे डेव्हलप करण्याची गरज भासू लागते त्याच काय!! मला त्याच्या खोड्या बघताना खूप मज्जा येते, मी त्याला ते करूही देते ते करतानाचे व्हीडिओ , ऑडिओ , फोटो सुद्धा काढते ते आज्जीआजोबाना पाठवल्यावर त्यांचा मला एकच प्रश्न असतो "एवढा राडा करत असताना शांत उभी राहून विडिओ कसा काय काढावासा वाटतो ग तुला?" मी म्हणलं "करते मी , झालेला नुकसान त्याच्यावर ओरडून किंवा मारून भरून येणार आहे का , नाही ही ना मग त्यापेक्षा मी, तो जे करतोय ते साठवून ठेवतेय तो मोठा झाला कि दाखवेन त्याला !!
कोणासाठी किती गंभीर गोष्ट असू शकेल ही सांगता येत नाही पण मला असा वाटतं बाथरूम वापरणं हा प्रत्येक व्यक्तीचा बेसिक अधिकार आहे हा अधिकार ८०% अयाना मिळतच नाही हे वाचायला कितीही विचित्र वाटत असलं तरी सत्य आहे . राम ला चालता यायला लागल्यापासून मी शु ,शी व अंघोळ यापैकी काहीही करायला गेले आणि बाहेरून दारावर टकटक झाली नाही असा एकही दिवस मला आठवत नाही. आईनी यापैकी काहीही करायचं नसतं असा त्याच स्पष्ट मत असेल असा मला वाटतं ,अर्थात थोडा मोठा झाल्यावर त्याला हे विचारायलाच असा ,मी ठरवलंय . सध्या तरी घरातल्या इतरांसाठी ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट आहे असो !!
या वेड्या वयाच्या माफ करा हं वेड लावण्याच्या वयाच्या (हे जास्त योग्य वाटतंय) मुलांना हागुन झाल्यावर पण वेगळी कुठूनतरी शक्ती प्राप्त होते याचा शोध लावायचा आहे, कुणी लावला असेल तर मला पण कळवाल बरंका ! शहाण्या मुलासारखा टॉयलेट मध्ये जाऊन आपली पोट्टी ओढून त्यावर अगदी शांतपणे शी केली मी स्वयंपाकघरात होते "आईई शी झाली !!!" चा आवाज आला मी हातातला काम टाकून फक्त हात धुवून येईपर्यंत या महाशयांनी पोट्टी मध्ये पाणी भरायला सुरवात केली होती. मी पोहोचले तेव्हा त्याचा शेवटचा मग पोट्टी मध्ये ओतून झाला होता ती पोट्टी गच्च भरून वाहायला लागली सोबत त्याची शी पण बाहेर येऊन सगळं बाथरूम घाण करून ठेवला या मुलानी , "अररेरेरेरे नको रेरेरेरे !!!!" म्हणेपर्यंत परिस्थिती फारच हाताबाहेर गेली , यावेळी मात्र मोबाइलला काढून विडिओ काढणं डोक्यात आलं सुद्धा नाही , एक पाठीत धपाटा घातला शी धुतली आणि बाथरूम च्या बाहेर काढलं मी त्याला आणि मोठ्याने दम दिला "आता जर काही उद्योग केलास तर उखळाला बांधून ठेवेन !!" यावर अगदी शांतपणे त्यांनी विचारला "आईईई कुठाय उखळ ?" या वर परत मी निरुत्तर घरात हशा !! मी मात्र बाथरूम घासत घासत हसत होते त्याच्या प्रश्नावर ..
आपल्या खेळण्यांमध्ये गोष्टी भरून ठेवणे हा अजून एक फारसा गंभीर नसणारा पण डोकेदुखी ठरू शकणारा उद्योग या वयातली मुलं करतात , राम ही त्याला अपवाद नाही फक्त मला वाटतं कि त्याची पद्धत वेगळी आहे , बिस्किटाचा चुरा कपड्यांच्या खणात लपवला होता कधी , कसा , केव्हा काहीही माहिती नाही , पण त्याच्याच धुतलेल्या चड्डीवर १५-२० मुंग्या बघून मला शंका आली आणि कपडे खाली काढल्यावर कपाटात इतक्या मुंग्या होत्या मग लक्षात आला काय झालं असेल ते . आता घरात मुंग्यांची रांग दिसली कि तिकडे जायचं सगळं स्वछ करायचं हे ठरलेलं काम!! आजकाल नवीन शिकलाय " राम असा का करतोयस?" असा विचारला की "असंच !! " असं उत्तर देतो . पांडा कार मध्ये पाणी भरणे , तीन चाकी मध्ये पाणी भरणे , पाणी भरून त्यात माती टाकणे , मागे एकदा तांदूळ टाकले पांडा कार मध्ये मग त्यात पाणी भरलं , मग " तांदूळ घ्या तांदूळ !" म्हणून घरभर ती पांडा कर घेऊन फिरत होता , ३ वाटी तरी तांदूळ होते वाळले कि त्याचं काय काय करता येईल हे शोधून ठेवलं आणि कसे बसे संपवले . धान्य खेळणं हा आवडता उद्योग आहे आमचा..
अंड्यांबद्दल खूप कुतूहल आहे राम ला कारण आम्ही शक्यतो त्याला हात लावू देत नाही का ते सांगायला नकोच पण मोबाइल वर अंडा कसा फोडतात ठाक -ठाक करून हे बघितल्यापासून त्याला ते करायचा होता आणि आम्ही ते करू देत नव्हतो , पण मामाकडे गेल्यावर त्याला हा चान्स मिळाला कारण मामाच्या फ्रिज त्याला आरामात उघडता येतो मी ठाक ठाक करून बघतो असा म्हणत गपचूप एका पाठोपाठ एक अशी २ अंडी त्यांनी तिथेच फ्रिज जवळच फोडली, माझी वाहिनी आणि आई तिथे पोहोचेपर्यंत फरशीवर ते सगळं राडा झाला होता आरेदय, मग त्यात नाचायचं होता जे त्याला मामी नी करू दिलं नाही आता जे एक अंड फ्रिज मध्ये शिल्लक होतं तेच हवं म्हणून तो ओरडत होता " लास्ट वने! लास्ट वने! म्हणत फ्रिज च्या दाराला पाय लावून उभा राहून दार बंद करू न देता मोठ्या हुशारीने त्यांनी अंड आपल्या हातात घेतल आणि फोडणार एवढ्यात आईनी शेजारी असलेलं घासून ठेवलेलं वरणाच भांडं खाली धरलं आणि अंड्याचा फर्शीवरचा नेम चुकला आणि ते भांड्यात पडलं !!! हे सगळं मामा लांब उभा राहून बघत होता आणि मी तिथे नव्हते मी घरी आल्यावर हा सगळा किस्सा ऐकला .. अर्थात हसू कंट्रोल करून (नाहीतर मला फार बोलणी बसली असती) त्यात राम च्या मामाकडे नॉनव्हेज साठी वेगळी भांडी आहेत ,पण या मुलामुळे आईला तिचे स्वयंपाकघरातले नियम बाजूला ठेवावे लागले , एवढा मोठा बदल फक्त आमचा रामच घडवून आणू शकतो असं माझं आणि माझ्या भावाचं ठाम मत झालं. इतके उद्योग करूनही तो सगळ्यांचा लाडका आहे .. आणि सगळ्यांना त्याच खुरूप कौतुक वाटतं .
तुमच्या मुलांचे काही किस्से असतील तर ते मला कंमेंट सेकशन मध्ये नक्की कळवा .
Comments
Post a Comment