Posts

कानसेन

Image
 शाळा .... रामला मी प्ले ग्रुप ला घातलंच होतं त्यामुळे शाळा ही  कन्सेप्ट त्याला नवीन नव्हतीच.. फरक एवढाच होता की ही मोठी शाळा आहे .. मोठे वर्ग .. मोठी जागा .. सगळंच भव्य दिव्य .!. त्याला पण आवडलं  आणि मलाही आवडलं .. त्याच शालेय जीवन सुरु झाल्याचा मला आनंद तर आहेच पण एक टेन्शन सुद्धा आलंय .. करेल ना नीट.?. जमेल ना त्याला .?. टिपीकल !! शाळेत "आज काय काय शिकवलं ?" यावर मला कधीही उत्तर मिळत नाही .डबा  खाल्ला का यावरही कधीतरी उत्तर मिळतं , पण कुणाचंही  लक्ष नसता शाळेत शिकवलेले श्लोक , गाणी , गोष्टी..  एकटाच असताना तो म्हणतो , मी ऐकते ! फार मज्जा येते ऐकताना .. एकदा  स्वयंपाकघरात काम करताना राम हॉल मध्ये गाडी पार्किंग खेळात होता आणि खेळता खेळता श्लोक म्हणायला सुरवात केली " मोरया मोरया मी बाण ताणें .. तुझीच सेवा कर कुण्या जाणे ... अन्याय माझे कोटीच्या कोटी.. मोरेश्वर आबा तू झालं छोटी ..!" माझे कान तिकडेच होते .आधी मला समजलं च नाही हा नक्की काय म्हणला .. "मी  बाण ताणें ..?" हे नक्की कोणत्या श्लोकात आहे.. हा नक्की काय श्लोक आहे.. या श्लोकाशी मिळता  जुळता  श्लोक मला

रामची सायकल

Image
सायकल घेऊन देताना रामपेक्षा जास्त आनंद मला आणि प्रणव ला झाला होता मला ३ री मध्ये असताना मिळाली होतोय आणि याला ३ वर्षांचा असतानाच मिळालीये ..!! त्यादिवशी सायकल घरी घेऊन येतानाच तो झोपून गेला ते थेट दुसऱ्यादिवशी सकाळीच जाग आली त्याला.. उठल्या उठल्या आधी गॅलरी मध्ये गेला सायकल दिसल्यावर  राम चा आनंद बघण्यासारखा होता.. सगळ्या घरात सायकल  फिरवत होता पूर्ण पँडल  मारता येत नव्हतं पण प्रयत्न पूर्ण करत होता ... सगळ्यांना त्याची सायकल दाखवली हाक मारून मारून.!!. सायकल ला मागे एक सीट आहे त्यावर अनय बसणार हे त्याच त्यानी पक्क करून सगळ्यांना सांगून टाकलं .. "मी बसू का?" असं  काव्या नि विचारलं .. मी समोरच उभी होते म्हणलं बघू काय म्हणतोय , तर चक्क " हो..  तू मागे बस आता अनय नाहीये तर .. शेअरिंग  इस कॅरिंग !" मी पण एक्दम उत्साहात "व्हेरी गुड राम !" असा म्हणलं . त्या दिवशी रात्रीच त्या सायकल चं  सगळं प्लास्टिक च कव्हर काढून फेकून देण्यात आलं मगच स्वारी झोपायला गेली . आता शाळा सुरु व्हायला थोडेच दिवस शिल्लक राहिले होते .. ३-४ दिवसातच तो पूर्ण पेंडल मारायला लागला . !! रोज उठू

उन्हाळ्याची सुट्टी भाग - ५

Image
संध्याकाळचे ७:३० वाजलेले .. आज राम खेळून आला घरात .. बूट काढले पाणी प्यायला आणि बेडरूम मध्ये गेला .. मी स्वयंपाकघरात त्याच्यासाठी जेवण बनवत होते, मेथीचे पराठे .. छान कणिक भिजवलेली होती.. प्रणव ची मीटिंग चालू होती.  आई पेपर वाचत होत्या हॉल मध्ये .. सगळं शांत ... सुरळीत !!.. मी हा वेळ  चांगला १५ मिनिटे  अनुभवला .. इतकं छान वाटलं शांत .. पळापळी नाही ! आरडा ओरडा नाही..! पण १६ व्या  मिनिटाला हीच  शांतता मलाच खायला उठली.. एवढा शांत .!. ते पण राम घरात असताना .! काहीतरी अजब आहे.. ही  चांगली शांतता नाहीये .. किंवा यावेळेला ही शांतता चांगली नाहीये !!!  काहीतरी गडबड आहे.. हात धुवून मी बेडरूम मध्ये गेले तर महाशय बाथरूम मध्ये होते .. माझा साबण जो बेसिन वर होता तो .. बाथरूम मधल्या स्टूल वर चढून  यानी खाली काढला होता.. स्वयंपाकघरातून काटा चमचा कधी नेला होता मला अजूनही समजल नाही .. साबणाला काट्या चमच्याने भोसकून भोसकून त्याचा लगदा केलेला होता .. पूर्ण साबणाची वाडी वाया गेलेली मी बघितली आणि सगळी कडे साबण ..! हात तर बारबाटलेलेच होते पण त्याचे पांढरे छाप बेडरूम च्या भिंतीवर...!!  वास्तुशांत झाल्यासारखे .

उन्हाळ्याची सुट्टी भाग- ४

Image
अजून दीड एक महिना तरी शाळा सुरु होण्यासाठी आहे सकाळी सकाळी ब्रश करण्याची रेस लावली होती तेव्हा माझ्या डोक्यात विचार सुरु होते की पाणी खेळण्या पेक्षा बाकीचे उपक्रम काही करता आले तर राम ला मजा पण येईल आणि मला पाणी वाचवता येईल त्याबरोबरच थोडी कामं कमी होतील अश्या विचारात असतानाच राम च्या हाताला स्वयंपाकघरातील हिंगाची डबी लागली आणि ती उलटी करून उघडणं त्याला सहज सोप्प गेलं परिणाम ... तोंडात ब्रश धरून खाली सांडलेलं हिंग गोळा करत होते मी !! तोंडातली पेस्ट आणि खाली सांडलेलं हिंग यांचं मिश्रण ना होऊ देता आणि कुणाच्याही पायाखाली यायच्या आत जेवढं शक्य होता तेवढा हिंग पुन्हा डबीत भरला आणि घरभर त्याच झाकण शोधत मी फिरत होते... !घाई घाईनी तोंड धुवून परत स्वयंपाकघरात गेल्यावर दिसलं रॅक मधले सगळे डबे राम नि खाली काढलेत आणि चमच्याने तो वाजवतोय ऑर्केस्ट्रा ....!! झाकण सापडला नव्हताच पण डबी मी वर ठेऊन दिली ...माझं थोडं स्वयंपाक घरातलं काम होईपर्यत वाजवू देत ... प्रणव नि दूध पाजणे , दात घासून देणे , शी धुणे हि काम करेपर्यन्त मी दूध तापवणे , नाश्त्याची तयारी करणे , आमच्यासाठी चहा बनवणे हि काम उरकली ... आणि

उन्हाळ्याची सुट्टी भाग -३

Image
पाणी खेळणं हा या वयातल्या मुलांचा अत्यंत आवडीचा उद्योग असतो वेगवेगळ्या मार्गानी राम ला बाथरूम मध्ये तरी जायचं असतंच नाहीतर मठाचा नळ तरी सोडायचा असतो , किंवा प्यायला ग्लास भरून घ्यायचं अर्धाच किंवा त्यापेक्षा कमी प्यायचं उरलेलं खेळायला घ्यायचं .. हा एक दिनक्रम रोजचा सुरु झालेला होता सुट्टी संपायला किती दिवस उरलेत हे मी रोज बघत होते. कुठून नवीन नवी आयडिया शोधून काढतो राम कधी कधी फार कौतुक वाटतं  त्याच.. पण नंतरचा पसारा आवरताना मात्र सगळं कौतुक निघून जातं . दुपारचे साधारण १२:३० वाजले होते उन्हाचा पारा वाढलाय अशी बातमी टीव्ही वर चालू होती इकडे राम नि ग्लास भरून माठातील पाणी घेतल गॅलरी मध्ये जाऊन ओतलं , सगळे कपडे काढ्ले आणि त्या पाण्यात जाऊन बसला मी कामात होते माझं याकडे लक्षच नव्हतं थोडावेळ बसून त्यात लोळायला लागला आणि आनंदाने ओरडायला पण लागला मग मी विचार केला इतका कसला आनंद झालाय याला... येऊन बघते तर साहेब गॅलरी मध्ये ओतलेला पाण्यात पोहायची ऍक्टिंग करत होते .                     "काय करतोयस ?" असं मी शांतपणे विचारलं तर गळ्यातला धागा तोंडात घालत मला म्हणला गार पाण्यात पोहायला छान

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

Image
मावशी बरोबर मनसोक्त चिखल खेळून झाल्यावर स्वारी तबला आणि पेटी कडे वळली. मावशीला त्याला मांडीवर बसवून त्याचसोबत पेटी वाजवण्यापेक्षा त्या पोसिशन मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यात जास्त इंटरेस्ट होता असं मला सुरवातीला वाटला पण नंतर दोघेही अगदी इंटरेस्ट घेऊन त्या पेटीवर काम करत होते तल्लीन होऊन चालेल होता कितीतरी वेळ , पेटीवर " असावा  सुंदर चॉकलेट चा बांगला " वाजवून झालं, अर्थात कुणालाही समजल नसतंच ते , मग बाबा  म्हणला " लट उलझी सुल्झ जा बालमा ..." ते वाजव पण नक्की काय वाजवायचा आहे कुणालाच समजलं  नाही  त्यामुळे परत ते दोघं 'सा रे  ग म" वाजवायला लागले  आणि  मला किमान  घरातला आणि बाथरूम मधला चिखल साफ करायला वेळ मिळाला . त्याला आवडत खरंतर पण अजून लहान आहे तो , त्या वाद्यांचा योग्य आदर करून ते नीट वाजवायला शिकला तर मला फारच आनंद होईल .  उन्हाळ्याची सुट्टी सुरु होऊन १५/२० झाले नसतील तोवरच आमच्या ज्ञानात नवीन भर पडली होती " बोर होतंय !" वय वर्ष ३ जेव्हा म्हणतात , बोअर होतंय त्यावर वय वर्ष ३०/६० असणार्यांनी  काय उत्तर द्यायचं असतं  बरं ?? मग मी अजून खेळ  शोधून

पहिली उन्हाळ्याची सुट्टी - भाग १

Image
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर खरंतर मला त्याला समर कॅम्प ला टाकावं असं खूप वाटलं होतं  म्हणजे शाळेत जायची सवय पण मोडणार नाही आणि दिवसातले २-३ तास तो चांगल्या उपक्रमांमध्ये गुंतलेला असेल , माझं घरही  २-३ तास स्वच्छ राहील पण या आजकालच्या समर कॅम्प आणि ऍक्टिव्हिटी सेंटर च्या फीया एवढ्या वाढवल्या गेल्यात ना कि तेवढ्या पैशात घरातच एखादं प्ले स्टेशन , व्हिडिओ गेम , हॉट  व्हील्स चा सेट वगरे येईल.  (आमच्या आईवडिलांसारखाच आम्ही पण विचार केला आम्हाला नाही मिळाला, पोराला घेऊन द्यावा !) २ दिवसात त्या प्ले स्टेशन चा प्ले एकीकडे स्टेशन भलतीकडे ....  व्हिडिओ बाथरूम मध्ये ... गेम  बेडरूम मध्ये...  व्हील्स पायाखाली येऊन आमचं डोकं हॉट झालय असं काहीसं चित्र डोळ्यासमोर आलं आणि घेऊन द्यायच्या विचारांपेक्षा न घेऊन देण्यावर आमचं पटकन एकमत झालं ! आणि सगळेच विचार रद्द करून आलेली सुट्टी राम घरीच घालवणार असं ठरलं . तसं बघायला गेलं तर त्याची पहिलीच उन्हाळ्याची सुट्टी आहे ही आणि आई म्ह्णून माझीही !!  आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत जेजे काही करायचो ते सगळं राम नी  पण करावं या माझ्या अतिअपेक्षांवर राम नी