ब्रदर शार्क आणि बेबी शार्क
"अनय माझा छोटा भाऊ आहे ! मी अनय चा दादा आहे " हे राम च्या डोक्यात इतकं पक्कं आहे की "अनय बेबी शार्क आहे आणि मी ब्रदर शार्क आहे !!" असं तो मला नेहमी म्हणतो. मलाच काय पण त्याच्या शाळेतल्या वर्गमित्रांना, सोसायटी मधल्या मैत्रिणींना आणि मामाच्या घरी देखील सगळ्यांना हेच सांगून ठेवलंय .त्यामुळे अनय कोणालाही ओळखू दे किंवा न ओळखू दे,आमच्याकडे अनय ला सगळे ओळखतात. रामचा प्रचंड जीव आहे त्याच्या अत्त्येभावावर .या भावंडामध्ये तस वर्षभराचच अंतर आहे त्यामुळे या दोघांचं एकमेकांशी छान जमेल असं मला आणि प्राचीला वाटतं . खोड्या काढण्यामध्ये अनय जरा मागे असतो पण आपला दादा जे काही करतोय ते तो नीट लक्ष देऊन बघत असतो . रांगत जाऊन हळूच जाऊन अनय नी फ्रिज उघडलेला पाहून चालत चालत राम पण तिकडे गेला वरच्या बाजूच्या कप्प्यातून मसाल्याची पाकीटे बाहेर काढायला सुरवात केली ते बघून अनय खालच्या कप्प्यातून बाकीच्या वस्तू बाहेर काढू लागला .दोघंही नुसतच काढत असते तर ठीक होतं पण बाहेर काढून फेकून देत होते दोघं हुशार ! मी तिथे पोहोचेपर्यन्त फ्रिज च्या दाराचे खालच...