मुलगा माझा कामाचा.

 त्याच्यासमोर मेथी निवडायला बसल्यावर तो पण हळूच जवळ आला मी म्हणलं " हे बघ अशी पानं वेगळी कर आणि देठं वेगळी ठेव !" त्यानी सुरवात केली छान करत होता , मग बाबानी त्याला विचारलं , " तू काय करतोय " मेथी तोडतोय ", बाबा नि पुढे विचारलं " याच आपल्याला आता काय करायचं आहे ?" तो म्हणाला " यात जिरे घालायचे , मोहोरी घालायची.." बाबा म्हणाला "अअअ  मग काय करायचं ?" यावर तो म्हणला "मग हळद टाकायची .." बाबा ला पण मज्जा वाटू लागली होती, बाबा नि पुढे विचारला मग कायय करणार तु याचं ??" तर तो म्हणला" मेथीची भाजीची   कोशिंबीरचं करून टाकणार मी याची "! आम्ही सगळे खूप हसलो .. त्याला जवळ घेतल , शाब्बास म्हणलं , पप्प्या घेतल्या ,नुसती मज्जा ..!!! या वयातल्या मुलांच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. हा फोडणी घालायला कधी शिकला मलाही समजलं  नाही खुप बारीक लक्ष असतं  त्याच असं  त्याच्या प्ले ग्रुप च्या शिक्षिका पण म्हणल्या मला  पण हा स्वयंपाकातल्या गोष्टीकडे पण बारीक लक्ष ठेवतो हे बघून मला खूप कौतुक वाटलं त्याचं . .



वयाच्या तिसऱ्या वर्षात मुलांना मदत करण्याची इतकी इच्छा निर्माण होते मला पहिल्यांदाच समजलं हे !! आई कामात आहे दिसल्यावर तिला येऊन मदत करावी आणि तिनी मदत करू दिली नाही तर तिलाच ओढत ओढत स्वयंपाकघराच्या बाहेर घेऊन जावं म्हणजे थोडक्यात "मला करू देत नाहीस ते तू पण करू नकोस" वाले विचार किंवा तसं  करण्याची वृत्ती कुठून येत असावी बरं ?? मी एकदा भाकरी करत असताना ओट्यावर चढला म्हणाला  मलाच भाकरी करायच्या आहेत, त्याच्या  हट्टीपणा समोर मला हार मानावीच लागते , मग त्या भिजवलेल्या गोळ्यात अजून पाणी घातलं त्यानी आणि पातळ ज्वारीचं पीठ झाल्यावर त्यात थप -थप करायला सुरवात केली , सगळीकडे त्याचे शिंतोडे उडायला लागले मी ओरडुनच विचारलं  , "अरे काय करतोयस आज्जी रागवेल  ना" तर मला म्हणतो, " तू काळजी करू नकोस मी तिलाच भाकरी थापून देतोय ! ". पण त्यामुळे माझ्या स्वयंपाकघराची जी अवस्था झाली ना ते स्वच्छ करायला मला ३ दिवस लागले .  पोळ्या तर इतक्या वेळा लाटल्या आहेत  त्यानी की आता अजून काही वेळा केल्या  तर छान गोल पोळ्या करायला लागेल , खेळण्यातलं  पोळपाट लाटणं अजिबात आवडत नाही ,खरं -खरं  हवं असतं ! मी वापरत असले तर हातातून काढून घेतो , आज्जीला पण तसच करतो त्यावर आम्ही , तो शाळेत गेला कि स्वयंपाक करायचा असा दिनक्रम केला आहे. उगाच आत्तापासून मी स्वयंपाकघरातले स्वतःचे स्पर्धक वाढवणार नाही !! शेंगदाणे  भाजणे , गहू चाळणे ह्या  कामांमध्ये राम ची मदत , म्हणजे  कामाचे तास कसे वाढतात समजत देखील  नाही , मटार सोलणे , हरभरे निवडणे मात्र तो खूप छान करतो आणि आवडीने करतो ,फक्त  त्यात एखादी आळी निघाली तर मग आम्ही फार घाबरतो .. आम्हाला त्या अळीच्या जीवाची फार काळजी वाटते .!



बाकी भांडी वाजवणं , डब्यांवर डबे ठेवणं , मोठ्या पातेल्यांमध्ये जाऊन बसणं , परातीत नाचणं हे तर रोजचं आहे , यात जर त्याला असा वाटलं की आपल्याकडे कुणी लक्ष देत नाहीये , मग याच्या वरची लेवल सुरु होते , डबे उघडणं , तरीपण कोणी बघितला नाही कि पिठात डाळी डाळीत पीठ गेलाच म्हणून समजा !! एकदा मोठ्या डब्यातच बसायचं होता नव्हे त्यातच झोपायचं होतं , त्यात तो छान बसला मग मात्र झोपच निघून गेली , गाणी म्हणून झाली गप्पा मारून झाल्या , सगळ्यांना फोन करून झाले , कुठे झोप येतीये , संध्यकाळी ५ वाजता स्वारी झोपेच्या अधीन झाली !



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

रामची सायकल