तिसरं वर्ष :वेडं वय

 

प्रत्येक बुधवारी राम च्या शाळेत फळ द्यावं लागतं डब्यांत , पहिल्या बुधवारी घरी आल्यावर मी विचारलं डब्बा खाल्ला का ? तर तो म्हणला नाही , मावशींनी काढून घेतला , सगळ्यांना आश्चर्य वाटलं , आमचे बाबा म्हणाले " परत असं झालं तर मला येऊन सांग हां "! पुढच्या बुधवारी पुन्हा मी त्याला डब्यात फळ दिलं घरी आल्यावर पुन्हा मी विचारलं "राम डब्बा खाल्ला का?" राम म्हणाला "नाही मावशींनी काढून घेतला "! , सगळे परत आश्चर्यचकित ! आमचे बाबा म्हणले "ह्या मावशीला बघायलाच पाहिजे पोरांचे डब्बे काढून घेते म्हणजे काय माझं लेकरू उपाशी राहतंय  !" मी म्हणाले "तसं  काही नसेल बाबा शाळा आणि शाळेतला स्टाफ खुप चांगला आहे इथे आपल्याला वाटतंय त्यापेक्षा वेगळा आहे काहीतरी आपण बघू "! नंतरच्या बुधवारी मी आणि बाबा दोघंही राम ला आणायला गेलो तिथेच त्याला बाबानी विचारलं "डब्बा खाल्ला राम ?" नेहमीसारखाच राम नि उत्तर दिलं "नाही मावशींनी काढून घेतला !" हे नेमका मावशींनी ऐकलं बाबा त्या मावशींना काही म्हणणार एवढ्यात मावशीच येऊन सांगू लागल्या "आओ तुमचा नातू केळ अर्ध्या पेक्षा जास्त खातो उरलेला हातात दाबतो मग तेच हात आमच्या साड्याना  लावतो साडी चिकट खरकटी होते मग हातावरून खाली पडला की ; सगळी फारशी चिकट होते बाकीची पोरं त्यात पाय देतात सगळी classroom चिकट होते माझा दार बुधवारी हा उद्योग वाढतो म्हणून मी काढून घेते ! " हे सगळं मी शांत पाने ऐकून घेत होते कारण मला वाटलंच काहीतरी वेगळा असणार राम सांगतोय त्यापेक्षा ! मावशीचं म्हणणं ऐकताना आमचे बाबा मात्र खो खो हसत होते. मग म्हणले,"लहान आहे तो, करणारच तुम्हाला त्यासाठीच नेमलाय इथे !!" मी मात्र त्यांना, "सॉरी बरका आमचा राम फारच काम वाढवतो तुमच" असा म्हणून काढता पाय घेतला. नंतर मी पण खूप हसले ते वेगळं ! काही महिन्यांपूर्वी राम ला मी फळं खायची सवय लावायचा खूप प्रयत्न करत होते अजूनही ते चालूच आहेत पण तो खूप choosy आहे ठराविक फ़ळं तो  आवडीने खातो ; पण खाऊन झाला कि उरलेली मूठीत धरून दाबायची असतात मग त्यातुन रस बाहेर येतो ते थेंब  बोटांवरून -हातावरून खाली फरशीवर असा सगळीकडे साग्रसंगीत राडा होतो  मग कुणीतरी ते सगळं हातातून काढून घेतं आणि आमचा  फळं खाण्याचा कार्यक्रम संपतो. हात धुणे हा कार्यक्रम मी फारशी पुसून झाली की करायचा कि आधी या विचारात असतानाच तो निघूनही गेलेला असतो. 

असा म्हणतात तिसरं वय हे वेड  वय असतं नक्की वेड कुणाला लागत  मुलाला कि त्याच्या आईला ? हा मला पडलेला प्रश्न आहे ! याच उत्तर मला कोण देऊ शकेल हे माहिती नाही पण राम मात्र मला रोज वेगळे प्रश्न विचारून निरुत्तर करतो . मी त्याला असे प्रश्न पडतायत म्हणून मनातल्या मनात खुश होते ,व माझ्याकडे उत्तर नाही म्हणून हताश !

श्रीरामपूर वरून अहमदनगर ला येताना एक नदी लागते त्यात मंदिर आहे नदीचं नाव प्रवरा ! नदीमध्ये एक सुंदर मंदीर आहे. तर पुलावरून जाताना मी राम ला मंदिर दाखवलं म्हणलं, "बघ नदीमध्ये किती छान मंदीर आहे "! तर यावर तो म्हणाला " मला नदीमध्ये धबक धबक करायचा आहे "! मी म्हणलं " नदीचं पाणी खोल आहेय आणि बघ ते किती शी शी आहे "! राम म्हणला " खोल पाण्यात मंदीर का बुडत नाही ?" मी म्हणलं " अरे नदीच्या पात्रामध्ये मोठा दगड आहेय त्यावर मंदिर बांधलय !" राम म्हणला "हे पात्र आहे का?" मी म्हणलं "... हो नदी जिथून वहाते त्याला पात्र म्हणतात !" यावरत्यांनी विचारला मंदिर स्वच्छ आहे का? मी म्हणलं "हो "!तर त्यांनी पुढे विचारलं " मग शी शी पाण्यात मंदिर का बांधला ?? मी थोड थांबले मग विचार केला कि याला गप्प नको करायला नाहीतर त्याची उत्सुकता संपून जाईल , मी शांतपणे उत्तर दिलं " बाळा मंदिर जेव्हा बांधला तेव्हा नदीचं पाणी एक्दम स्वचछ होता पण नंतर काही लोकांनी त्यात कचरा , घाण पाणी टाकायला सुरवात केली मग नदीचं पाणी शी शी झालं !" त्यामुळे आता त्यात धबक धबक नाही करता येणार ". या वर तो "ओके" असा म्हणला आणि मग मी सुटकेचा नि:श्वास  टाकला. त्यानं विचारलेले प्रश्न खुप निरागस पण आपल्याला विचार करायला लावणारे होते असा मला वाटतं . लक्ष वेधून घेण्यासाठी हा ३ वर्षांचा पिटुकला इतक्या वेगळ्या वेगळ्या करामती करतो कि हसावं का रडावं मला समजत नाही , त्याला सांगितलं कि जो कचरा ओला असतो तो या ब्लू डस्टबिन मध्ये टाकायचा आणि  शु शु बाथरूम मध्ये करायची कारण ती चांगली नसते , तर त्याने दुसऱ्या दिवशी डस्टबिन मध्ये शु केली . मला खूप राग आला मी विचारलं तू का केलास असं तर मला म्हणलं आई शू शू ओला कचरा आहे ना ?" मी कपाळाला हात मारून डस्टबिन घासायला  घेतलं .  एकदा अंघोळीच्या पाण्याच्या बादलीत शु केली आणि म्हणला शू  ला अंघोळ घालून स्वचछ करतो ना . तिखट मिठाचा डब्बा , हळदी कुंकवाचे पाळे आता फक्त माळ्यावर ठेवायचे  बाकी आहेत, रोज एकदा तरी हळदीत लाल तिखट आणि मसाल्यात मोहरी जिरे जातातच. कुंकवात हळद आणि हळदीत कुंकू पण रोजचा ठरलेला आहे आणि ते देवांना पण लावायचं , त्यात पाणी पण ओतायचं असतं , तेच लाल रंगाचं  पाणी घरभर होत मग ते आवरतानामाझी दुपार कशी संपून जाते समजतच नाही , त्याचा दहशतीमुळे आमचं देवघर सुद्धा टेबल वर शिफ्ट झालंय . पण टेबल वर चढून राम ची वेगळी देवपूजा चालते. 

सगळ्या खेळण्यांना रोज त्याचा अंघोळीला सोबत घेतो तो नंतर ती दिवसभर गॅलरी मध्ये वळत असतात ती पायाखाली येऊ नयेत म्हणून सगळ्यांची कसरत चालू असते तरीपण एखादं छोटा खेळणं, गाडी येतेच कुणाच्यातरी पायाखाली . झाडांना पाणी घालणे हे बाबा आणि मुलाचा जॉईंट household work असता पाणी घालायच्या आधी तो सगळ्यांना विचारतो, "कुना कुणाला पाणी प्यायच् मी आणलंय " असा म्हणत त्याचा गप्पा चालू होतात झाडांशी हे माझ्यासाठी पण  नवीन होता कारण आम्ही गप्पा  मारायला वगरे नाही  शिकवलं त्याचा तोच करतोय हे सगळं बघून मला फार कौतुक वाटलं .

या वयातल्या मुलाच्या tantrums आणि moodswing बद्दल मोठे मोठे बालरोगतज्ञ देखील अंदाज सांगू शकत नाहीत . रोज सकाळी राम च्या मनात नवीन इचछा निर्माण होतात मागच्या महिन्यात रात्री ११ वाजता त्याची शाळेची  बॅग घेऊन मला गोवा लाच जायचं म्हणून हट्ट धरून बसला . इतका रडला कि उलटी झाली रडून रडून सगळ्यांनी समजावून सांगितलं पण ऐकायचं नावच नाही शेवटी  इ आणि त्याचा बाबानी two  व्हिलर वर डेक्कन पर्यन्त जाऊन आलो , परत येताना झोपून गेला मग आम्ही दोघं शांत झोपू शकलो. एकदा रात्री ३:३० ला मामाच्या घरी जायचं होतं खुरूप झोपेत होता तो आणि आम्ही पण ! समजावून सांगून सुद्धा दमलो , माझं तर ओरडून पण झाला त्याच्यावर, भिती  दाखवून झाली तरीपण मामाकडे जायचं म्हणून  रडत  होता , शेवटी मामाला उठवला झोपेतून फोने करून विडिओ कॉल वर मामा कडून वाढवून घेतला कि सूर्य बाप्पा आले कि भेटू मग झोपला ५ वाजता ..मग आम्ही झोपलो, पर्यायाने त्या दिवशी सगळ्यांचाच दिवस उशिरा उजाडला . वेळी अवेळी त्याला आत्या  , मामा, त्याचा मित्र , मावशी आठवत असतात ज्यांच्याकडे लगेच जायचं असतं आणि आम्हाला थापा माराव्या लागतात. 

अजून खूप किस्से आहेत मजेशीर ... राम आल्यापासून माझा आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड झालीये दुसऱ्या मिनिटाला काय करावा लागेल याचा काही नेम  नाही 


Comments

  1. हे अनुभव आत्ताच मिळतील... जसे पुढे बंद होतील तसे तुला वाईट वाटेल

    ReplyDelete
    Replies
    1. Hoo मलाही असाच वाटतंय की मी नंतर हे miss करेन

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

असा हा म्हणून अशी मी !

उन्हाळ्याची सुट्टी भाग - २

रामची सायकल