फर्स्ट cry आणि मी


१७ JAN २०२० पासून मी फर्स्ट cry  शी जोडले गेले ते माझ्या मुलामुळे. हा प्रकार देशी कि विदेशी यामध्ये ना घुसत मी माझ्या मुलासाठी फर्स्ट CRY निवडायला लोकडाउन  हे खूप महत्वाचा कारण. . premature  मुलांचे सुद्धा कपडे या ऐप वर आपल्या आवडीनुसार मिळत असल्यामुळे मी पँझीली पसंती फर्स्ट cry लाच दिली . सध्या फर्स्ट  cry ची नवीन tagline आलीये "fussy इस फँटॅस्टिक ! " त्यामुळे माझ्यासारख्या लाखो fussy तरीपण परफेक्ट आयांना आगाऊ  किंवा आतिशहाण्या  ना समजता मुलांना फर्स्ट प्रायोरिटी ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करतानाच योग्य तिथे प्रोटेक्ट करणाऱ्या फॅन्टाटिक आया दाखवून न्याय देण्याचं काम केलंय त्यामुळे त्यांचा किती फायदा झालाय ते त्यांचा वार्षिक जमाखर्च  आणि BSC  स्टॉक मार्केट च्या share price  वरून  लगेच समजून येतं !फर्स्टcry  वर वेगवेगळे कपड्यांचे ब्रॅण्ड्स आपण बघू शकतो. जसं की बेबीहग, बेबीओये , लॉलीपॉप ,कार्टर्स ,earthlytouch, toffy house  इतकं. फर्स्ट cry च्या एप वर आपल्याला सर्व बघता  येतात अतिशय सहज सोप्पी आणि घरबसल्या लहान मुलांसाठी आपण सर्व प्रकारची शॉपिंग करू शकतो.pemature बाळापासून ते १४ वर्ष्याच्या मुलं आणि मुलींसाठी लागणारे सर्व साहित्य अगदी दुधाच्या पावडर पासून इलेक्टिक स्मार्ट गाडझेट्स पर्यंत सगळा या साईट वर उपलब्ध आहेय. फक्त मुलांसाठीच नाही तर २१'स किड्स हॅन्डल करणाऱ्या ९०'s किड्स असणाऱ्या पेरेंट्स साठी पण ब्रेस्ट पॅड्स पासून कॉस्मॅटिकस पर्यंत आणि बाळाची पोटात असताना कशी काळजी घ्यावी इथपासून ते टीनएज मुलांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांच्यासोबत कसे वागावे त्यांना कसे हॅन्डल करावे या गायडन्स  इथपर्यंत सगळं उपलब्ध आहे . त्यांच्या जाहिराती पण अगदी आजच्या सगळ्या घर घरात घडत असतील अश्या आहेत कि आमची पिढी त्याचाशी पटकन relate करते अर्थात आजचे आज्जीआजोबा देखील करत असतील ! यांना अश्या जाहिराती का सुचल्या असतील याचा उत्तर माझ्या नवर्यानी दिला कि आता त्याच्या मार्केटिंग डिपार्टमेंट ला ९०'स किड्स काम करत असतील आणि त्यांचे रोजचे प्रसंग यापेक्षा वेगळे नसतील नाहीतरी आपली पिढी नाविन्यपूर्ण , वेगळ्या वाटा निवडणारी ,आगाऊ , उर्मट , आणि खटपटी म्हणूनच ओळखली जाते .

आजकालचच्या आई बाबा  म्हणजे ९०'s  kid बरं का !! आम्ही तीच पिढी  जी शक्तिमान , रामायण आणि महाभारत बघत शाळेच्या बाहेर पेप्सी आणि बोरकुट खात मोठी झालेली आणि मोबाईल च्या सगळ्या उत्क्रांतीच्या पायऱ्यांचे स्वतःच्या शालेय आणि कॉलेज जिवनात घडणारे बदल आत्मसात करून साक्षीदार झालेली आमची  पिढी !!! आमच्या लहानपणी मोबाइलला नव्हता आणि मोठे झाल्यावर आम्ही ते तंत्रज्ञान आपल्या आईवडिलांना मोठ्या हुशारीने शिकवले आहे . याचा फायदा आणि तोटा दोन्ही आम्ही  सहन केलेला आहे. पण आता स्वतःच्या पोरांना यापासून कसा लांब ठेवायचं याचे मात्र आम्हाला  कलासेस लावावे लागणार आहेत . आताचे नविन आजी आजोबा नातवाला गाणी म्हणून दाखवण्यापेक्षा ती यूट्यूब वर लावून देतात आणि मोबाइल बघत बसतात अशा वेळी आम्ही confuse होतो .या नवीन आज्जी आजोबाना त्यांच्या  मुलांना खाली जाऊन बाकीच्या मुलांबरोबर खेळ हे सांगायची कधी वेळच नव्हती आली आणि आम्हाला मात्र मुलांनी एकमेकांमध्ये छान  मिळून मिसळून खेळावा यासाठी ग्राउंड ला भरमसाठ पैसे भरावे लागत आहेत त्यात पण मुलं एकमेकांशी मोबाइल आणि youtube बद्द्लच चर्चा करत असतात . म्हणूनं आम्ही fussy ! "काय गरज आहे ग्राउंड लावायची ?" या प्रश्नाला उत्तर देता देता आमच्या नाकी नऊ येतात मग आम्ही ठरतो ओब्सेससिव्ह मुख्यतः आम्ही ९०;s च्या  आया त्यांना टोटल आज्या आणि आजोबाना एकाच वेळी  तोंड द्यायचं असतं !! आम्ही काय तुम्हाला वाढवलीच नाहीत का?? आम्ही  तुम्हला असले प्रोजेक्ट कधी करून दिले नाहीत .. आठवतंय का? "आम्ही नाही घातला तुम्हाला कधी समर कॅम्प ला " तुम्ही शिकलात ना स्टेट  बोर्ड ला काय वाईट झालाय तुमचं ??  okey ज्या आज्जीनी पूर्वी जॉब केलाय त्याचे विचार आणि ज्या आज्जीनी घरी राहणं स्वीकारलंय  त्यांची मतं हि पूर्ण विरुद्ध अश्या आज्ज्या एकाच घरात असतील तर आमची ९०'s  कीड असलेल्या जोडप्याचे कायय हाल होत असतील हे तुम्ही इमॅजिन करू शकता . मग हे ९०' कीड होतात fussy !! यावर त्यांनी त्यांच्या आई बाबाना काय उत्तर दिली असती " काळ बदलला आहे ! परिस्थिती बदलली आहे पूर्वीसारखा सगळं सरळ सोप्पं आणि स्वस्त काहीही राहिला नाही " हे उत्तर ६०'s -७०'s  च्या किड्स ना आगाऊपणाचं वाटतं मग आम्ही होतो fussy , obsessive , शीस्त लावणं इतका अवघड झालाय आई बाबांची भीतीच वाटत नाही मुलांना मग स्ट्रिक्ट व्हावेच लागतं बरं प्रॉब्लेम आमचा झालाय कि आईबाबा वरून आज्जीआजोबा होताना कोणता chemical  लोच्या होतो समजत नाही मुलाना लावायचे सगळे नियम अचानक नातवंडांसाठी गायब झालेले असतात आणि आईबाबांना टोप्या कश्या घालायच्या याच नवीन नवीन tricks नातवंडांना आपोआप मिळू लागतात! मग हे ९०'स किड्स fussy होतील नैतर काय??

उण्याला भरती शाळा आहेतच ,माझा मुलगा प्ले ग्रुप ला आहे, त्याला शाळेतून असे होमवर्क  आणि ऍक्टिव्हिटी दिल्या जातात ज्या तो एकट्याने करूच शकत नाही तिथे माझा  ९०%  सहभाग मला द्यावाच लागतो त्याचा १०% असतो तो पण त्याच्या मनात असेल तर !!! मग माझी सगळी कामं  सोडून मी त्याचा घरचा  अभ्यास पूर्ण करून घेते हि मुलं इतकी पुढारलेली आहेत ना ,अशी अफलातून उत्तर देतात आयांना कि आम्ही निरुत्तर होऊन जातो ! " राम पसारा आवरून ठेव कित्ती हा पसारा चालता  पण येत नाही "!! तर मला राम कडून उत्तर मिळतं " मला काही प्रॉब्लेम नाही आई तू आवरून ठेव"! हा २०२३ चा प्ले ग्रुप चा मुलगा आणि मी गुपचूप त्याची खेळणी आवरायला घेते .. आणि आज्जीआजोबा "कित्ती बोलायला लागलाय हा एक्दम हुशार आहेय माझा राम म्हणत त्याला कौतुकच थाप देऊन माझी मज्जा बघत राहतात !!  (आफ्टरऑल मी fussy असते आणि म्हणूनच मी स्वतःला फँटॅस्टिक समजायला लागलीये ) पौष्टिक आहाराच्या बाबतीत माझ्या आईनी कधीच माझे लाड केले नाहीत म्हणून मी ठरवलं होता माझ्या मुलाला देखील मी तश्याच पद्धतीने सगळं खायची सवय लावणार त्याच उपक्रमाअंतर्गत मी राम ला म्हणलं "राम तो कृष्ण बाप्पा बघ कसा छान भरपूर लोणी खातो मग त्याला शक्ती येते ,घे तू पण थोडासा खा तुला पण शक्ती येईल "!! यावर राम उत्तर देतो "आई , कृष्ण बाप्पा बघ माती पण खातोय "!! पुढे तो गप्प बसला पण मी मनातल्या मनात पुढचं वाक्य पूर्ण करून डोक्याला हात लावला ! या उत्तरावर घरात एकच हशा पिकला आणि राम  ला समजला आपण काहीतरी भारी बोलून गेलोय तो पण सगळं समजल्यासारखं हसायला लागला . तर अशाप्रकारे हे २१'s  कीड्स आम्हा ९०'s किड्स वर भारी पडत आहेत आणि आमची मज्जा  ७०'s -८०'s किड्स बघत आहेत. माझ्या तर आईचे असे स्पष्ट मत आहेय कि माझ्या मुलांनी मला जेवढा त्रास दिलाय त्याचा सगळं वचपा व्याजासकट माझा नातू काढणार आहे! त्यामुळे त्याच्या प्रत्येक खोडीवर मी रडकुंडीला आलेली असते आणि माझी आईचे हसून हसून डोळे पाणावतात . राम  च्या मामाची कुलदेवता गोवा  येथे असल्याने आम्ही त्याचा लग्नाची पत्रिका ठेवायला गोवा येथे गेलो होतो राम नि सगळ्यात जास्त एन्जॉय केल तिथं , समुद्र , मासे , वाळू आणि "हे नको करू, ते नको करू"!! असा ना म्हणणारी प्रेमळ आई  आणि पाण्यात घेऊन जाणारे आज्जीआजोबा स्वारी भलतीच खुश !!! आता झालं  असं , कधीही राम ला विचारला ना कि कुठे जायचं त्याच एकच उत्तर येत "मला गोव्याला जायचंय "! परवा  मी त्याला विचारलं की "राम, तुला नव इंडिया स्कूल ला जायचं कि ज्ञानप्रभोदिनी ला जायचं ?" तर मला त्यांनी उत्तर दिल "मला गोव्याला जायचंय "! यावर पुन्हा एकदा मी गप्प आणि घरात हशा !!! रोज माझ्या घरात असं काहींना काही घडतच असतं ज्यात ७०'s किड्स हसून हसून बेजार होतात आणि ९०'s किड्स, २१'s किड्स नी  वाढवलेली काम घातलेला पसारा आवरता आवरता बेजार होतात !!

तुमचे पण माझ्यासारखे मजेशीर अनुभव असतील तर माझ्याशी  कंमेंट मध्ये शेअर नक्की करा !!




Comments

  1. Khup sundar mandani ahe vishayachi.. ani vishaya pn chaan nivadlae.. All the best for future !! 😊👍🏻

    ReplyDelete
  2. thank you so much your comment means a lot to me

    ReplyDelete

Post a Comment